शिवजयंतीनिमित्त आझम कॅम्पस ते लाल महाल मार्गावरून निघालेली सर्वात भव्य अभिवादन मिरवणुक ठरली

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचा मोठा पुढाकार

एकूण ९ हजार विद्यार्थि या मिरवणुकीत सहभागी झाले होते..


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे: 'महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या  वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार दिनांक . 19 फेब्रवारी 2024 रोजी सकाळी साडे आठ वाजता संस्थेचे अध्यक्ष व डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. 



संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख, एस. ए. इनामदार, मशकुर शेख, साबीर शेख, अफझल खान, अब्दुल वहाब, शाहिद शेख, मोहम्मद  गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम बँक , आसिफ शेख, डॉ. गुलजार शेख, सिकंदर पटेल,विश्वस्त, पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, विदयार्थी  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक ठरली आहे एकूण ९ हजार विद्यार्थि  या मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणुकीचे हे २३ वे वर्ष होते.

या मिरवणुकीचा मार्ग आझम कँम्पस ते लाल महाल असा होता.पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिट्युट, जूना मोटर स्टॅंड, पद्मजी पोलिस चौकी, क्वार्टर गेट, संत नरपतगीरी चौक, नानाचावडी चौक, अरुणा चौक, अल्पना टॉकीज, इल्या मारूतती चौक,तांबोळी मशीद, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके चौक मार्गे लाल महाल येथे मिरवणुकीची सांगता झाली. 

 मिरवणूकीत शैक्षाणिक संस्थांचे सर्व प्राचार्य, पदाधिकारी, कर्मचारी, दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल-ताशांचे पथक, तुतारी, नगारे देखील सहभागी झाले होते .दरवर्षी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.

Post a Comment

Previous Post Next Post