३,४ फेब्रुवारी रोजी 'इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल'

इन्फोसिस फाऊंडेशन आणि भारतीय विद्या भवन तर्फे आयोजन

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : इन्फोसिस फाऊंडेशन आणि भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय 'इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल'चे आयोजन दि.३ आणि ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.दि.३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच  ते रात्री साडेआठ  तसेच  ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी दीडपर्यंत  आणि सायंकाळी  साडेचार ते रात्री साडेआठपर्यंत या फेस्टिव्हलमधील नृत्य सादरीकरणे  सरदार नातू सभागृह (भारतीय विद्या भवन,सेनापती बापट रस्ता ) येथे होतील.

भरतनाट्यम,कथक,ओडिसी,मोहिनीअट्टम,कथकली,बंगाली लोकनृत्य अशा नृत्य प्रकारांचा या महोत्सवात समावेश आहे.नृत्य महोत्सवाचे उदघाटन नृत्यगुरु सुचित्रा दाते आणि शशिकला रवी यांच्या उपस्थितीत होईल.अनेक संस्था आणि कलाकार नृत्य सादरीकरणे करणार आहेत. २०१९ मध्ये या नृत्य महोत्सवाची सुरुवात झाली.यावर्षी एकूण ८० कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. 

रसिका गुमास्ते या महोत्सवाच्या संयोजक असून संयोजन समितीत अस्मिता ठाकूर,नेहा मुथियान,शमा अधिकारी यांचा समावेश आहे. हा महोत्सव सर्वांसाठी  विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.



Post a Comment

Previous Post Next Post