सराफाला लुटुन पलायन केलेल्या सहा जणांच्या टोळीला अटक करून 28 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त.

   जुना राजवाडा गुन्हें शोध पथकाची कारवाई.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- गुजरी परिसरात असलेल्या भेंडे गल्लीत सराफाला कडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली ब्यँग  हिसडा मारुन पलायन केले होते.या गुन्हयांची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली होती.या गुन्हयांचा तपास गुन्हे शोध पथकाने घेऊन सहा जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल माल जप्त करून त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता 27/02/2024 अखेर पोलिस कोठडी सुनावली आहे.

या लुटमार प्रकरणी रोहित नारायण केसरकर (28.शिवाजी पेठ) रणजित मधुकर कोतेकर (35.रिंग रोड ,फुलेवाडी)स्वप्निल सुखलाल ढ़ाकरे(26.राजेंद्रनगर) सौरभ लक्ष्मण शिवशरण(24.राजेद्रनगर) तुषार जयसिंग रसाळे (28.तस्ते गल्ली ,मंगळवार पेठ) आणि ओंकार विजय शिंदे (29.शिवाजी पेठ)अशी त्यांची नावे आहेत.सराफ व्यावसायिक दादा नामदेव मेटकरी (रा.चंबुखडी) हे 14/02/2024 रोजी घरी जात असताना देवकर पाण्ंद येथील पेट्रोल पंपावर दबाधरून बसलेल्या चार ते पाच जणांनी मोटारसायकल वरुन पाठलाग करून गाडी अडवून त्यांच्या कडील असलेली सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली ब्यँग  हिसडा मारुन नेली होती.याची तक्रार मेटकरी यांनी 17/02/2024 रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली होती.याबाबत तपास सीसीटीव्ही फुटेज द्वारे करीत असताना हा गुन्हा सहा जणांनी केल्याची माहिती मिळाली असता त्यांचा शोध घेऊन अटक केली असता त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सराफाला लुटल्यांची कबुली दिली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,शहर उपविभागीय अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे,गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संतोष गुळवे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली..

Post a Comment

Previous Post Next Post