हेरले हायस्कूल हेरले येथे शालेय वार्षिक पारितोषिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न


प्रेस मीडिया लाईव्ह :

 हेरले प्रतिनिधी  /संदीप कोले 

  उपरोक्त विषयाला अनुसरून हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप चे हेरले शाखेच्या वतीने शालेय वार्षिक पारितोषक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सुरुवात दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले, सरस्वती, स्वर्गीय बाळासाहेब माने यांच्या प्रतिमेस सेवानिवृत्त मुख्याध्यापक  एम.के. डांगे, बी. बी कराळे , लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, उर्मिला कुरणे, गीतांजली चौगुले, रंजना माने, संस्थेचे प्रतिनिधी संतोष पाटील,हेरले हायस्कूलचे  मुख्याध्यापक शिंदे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रम प्रसंगी पत्रकार समीर पेंढारी संदीप कोले,अनिल उपाध्ये व मान्यवरांचा  शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये यश  संपादन केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 हा कार्यक्रम श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप चे.शाखा हेरले  वर्षी प्रमाणे  स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. याही वर्षी शाळेचे मुला मुलींनी आपले कला कौशल्य सादर करावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. आर. शिंदे ग्रंथपाल यु. आर.पाटील, क्रीडा शिक्षक बी.आर. हुजरे, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत  मुख्याध्यापक पी. आर. शिंदे यांनी केले  सूत्रसंचालन एस. आर. पाटील सर  यांनी केले व आभार 

 या कार्यक्रमासाठी हायस्कूल हेरलेचे शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post