संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये माजी विद्यार्थी "मिलाफ ॲल्युमिनी मीट २०२४" उत्साहात संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे

अतिग्रे तालुका हातकणंगले येथे संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये माजी विद्यार्थी "मिलाफ ॲल्युमिनी मीट २०२४" या कार्यक्रमास माझी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद नोंदवला. “संजय घोडावत इन्स्टिट्यूट असोशियन” धर्मदाय नोंदणी कृत संस्थेचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले असून असोशियन कार्यकारणीवर कार्य करणाऱ्या समिती पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूट प्राचार्य, डॉ. विराट गिरी, कार्यक्रम समन्वयक बी. के. पाटील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले म्हणाले आपण आत्मसात केलेल्या अभ्यासक्रम त्या अनुषंगाने आपण विविध क्षेत्रात करत असलेले कार्य यात वेळ काढून तुमचे शिक्षण पूर्ण केलेल्या संस्थेत एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व माझी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करून संजय घोडावत ग्रीन कॅम्पस मध्ये स्वागत केले. ते म्हणाले जग बदलत चालले आहे. बदलणे ही काळाची गरज असून आपण पूर्ण केलेले शिक्षण त्यामध्ये होत असलेले नवनवे बदल आणि बदलला अनुसरून संजय घोडावत शैक्षणिक कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी आधुनिक जागतिक लेव्हलची शिक्षण पद्धती उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा निर्माण केलेल्या आहे. संजय घोडावत कॅम्पस मध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या आणि शिक्षण घेत असेल्या प्रतेक विद्यार्थ्यांला आधुनिकतेच्या ज्ञानामध्ये कोणती कमतरता राहणार नाही अशी अशी ग्वाही देऊन उपस्थितांचे मन जिंकली.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट गिरी म्हणाले ‘माजी विद्यार्थीसाठी “संजय घोडावत इन्स्टिट्यूट असोशियन” संस्था’ प्लॅटफॉर्म निर्माण केला असून संस्थेचे उद्दिष्टे, महत्व, कार्यकारणी, या व्यासपीठाचा उपयोग शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांना आणि इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार असून विद्यार्थी मेळाव्यातून ज्ञानसंवर्धन, भविष्यकालीन योजना, नवे बदल आणि भावनिक ऋणानुबंध एका सूत्रात जोडले जातात, असे प्रतिपादन डॉ. गिरी यांनी केले. 

यावेळी विविध क्षेत्रात वेगवेगळ्या उच्च पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करून इन्स्टिट्यूटने आम्हाला कसे घडवले, मार्गदर्शक प्राध्यापकांचे ऋण, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे नियोजन आणि उत्तम कार्याविषयी गौरवोद्गार काढले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. के. पाटील, सूत्रसंचालन कॉम्प्युटर विभागातील विद्यार्थी नेहा पाटील आणि प्रनीत भोसले, कार्यक्रमाचे आभार कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा. सागर चव्हाण यांनी मानले. 

संजय घोडावत विद्यापीठचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी माझी विद्यार्थी “संजय घोडावत इन्स्टिट्यूट असोशियन” वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

Previous Post Next Post