अल्पसंख्याक हक्कासाठी कुंभकरणाची झोप घेणाऱ्या सरकारला जाग करण्याची गरज आहे -फिरोज मुल्ला (सर)



प्रेस मीडिया लाईव्ह :

  पुणे.. अल्पसंख्याक हक दिवस साजरा न करणाऱ्या प्रशासनाला जाग करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर महा मायनाँरीटी एनजीओ फोरम या संघटनेचे अध्यक्ष जाकीरभाई शिकलगार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आले 

 


 पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांनी जनतेला संबोधित करताना म्हणाले अल्पसंख्याक समाजाने एकजुटीने कुंभकरणाची झोप घेणाऱ्या सरकारला रस्त्यावर उतरून आपले हक मिळवण्यासाठी सरकरच्या विरोधात आंदोलने उभे केले पाहिजे आणि आपले हक्क सरकार देत नाही तोपर्यंत सत्तेमधील कुठल्याच लोकप्रतिनिधीला जवळ न करता त्यांच्या सोबत रोजा इप्तियारी सारखे कुठलेच कार्यक्रम न करता समाजाची जानीव करून देणे काळाची गरज आहे अस केलतरच अल्पसंख्याक समाजाची दखल घेतली जाईल  अल्पसंख्याक समाजाला खिशात घेऊन फिरणारे नेते हे समाजाचा फायदा बघत नाही ते स्वतः च्या स्वार्थापोटी काम करत आहेत यांनापण समाजाने धडा शिकवला पाहिजे आणि प्रशासनाने मायबाप बनून शोषित पिडीत अल्पसंख्याक समाजाचे हक्क त्यांच्यापर्यंत पोहचविले पाहिजे परंतु अस होताना दिसत नाही राज्यकर्ते नेते आणि प्रशासनाने अल्पसंख्याक समाजाचा फुटबॉल केला आहे म्हणून समाजाने जागोजागी जन आंदोलने घेऊन सरकारला मजबूर केले पाहिजे असे बोलून फिरोज मुल्ला(सर) यांनी जनतेला संबोधित केले.

    यावेळी विविध संघटनेचे प्रमुख नेते जाहीदभाई,विठ्ठल गायकवाड, मतीनभाई मुजावर, जुबेर पिरजादे,कुमेल रजा, आस्लम वाटर,बियाबानी सर,सिंधुताई तुळवे, लक्ष्मीकांत कुंबळे, विजयाताई खटाळ,हे मान्यवर उपस्थित होते तसेच चाँदभाई बलबट्टी यांनी सुत्रसंचालन करून सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post