आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले




प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले  असून त्याची तयारी सुद्धा जोरदार सुरू असल्याचे  दिसत आहे . भाजप तर्फे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर,  सुनील देवधर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ, बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट इच्छुक आहेत. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही निवडणूक होणार आहे.

शिवसेने तर्फे माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नावाची चर्चा आहे. 

 काँग्रेसने पुणे लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज मागविले  असून . त्यामध्ये 20 जणांनी अर्ज भरले आहेत. ही नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येणार आहेत.

 काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची चर्चा सुरू सुरू आहे .

आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी  सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावल्याचे दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post