क्राईम न्यूज : गळा दाबुन जबरदस्तीने मोटर सायकल चोरुन नेणा-या आरोपीस ठोकल्या बेडया

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : दिनांक 17/01t2024 रोजी संतोष लक्ष्मण वरेकर वय 36 वर्षे, व्यवसाय- खाजगी नोकरी रा.ई वॉर्ड संत गोराकुंभार वसाहत, मार्केट यार्ड कोल्हापूर हे सीबीएस स्टॅन्ड येथुन आपले मोटर सायकल वरुन घरी जात असताना एका अनोळर्खी इसमाने त्यांना थांबवून आपणास शिंगणापुर येथे सोडणे करीता विनंती केली.. त्या वेळी फिर्यादी यांनी माणुसकीच्या भावनेतुन सदर इसमास शिंगणापुर येथे सोडणे करीता गैले असता रात्रौं 11.30 वाचे सुमारास खानसरी शिंगणापुर रोड येथील दत्तकॉलनीचे पाठीमागे आलेनंतर मागे बसलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादी यांचा गळा आवळुन फिर्यादीस चालत्या मोटर सायकवरुन पाइन, फिर्यादी यांची होंडा कंपणीची एस पी 125 मॉडेलची क्र.एम एच 09 जी सी 0253 जबरदस्तीने हिसकावून घेवुन चोरी करुन पळन गेले

याबाबत यातील फिर्यादी यांनी दिले फियादी वरुन लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं -46। 2024 भादंविस कलम 392 प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करणेत आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन मा.पोलीस अधिक्षाक सो, श्री महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र कळमकर यांना समांतर तपास करणे बाबत सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे मा. पेलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकड़ील सहा.पोलीस निरीक्षक, श्री सागर वाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, संजय कुंभार, सागर माने, संजय हुंबे, रामचंद्र कोळी यांचे तपास पथक तयार करुन त्यांना वरील गुन्हयाचा तपास करणे बाबत सुचना दिल्या होत्या. 

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि वाघ व अंमलदार हे सदर गुन्हयाचा तपास करत असताना त्यांनी कोल्हापुर मध्यवरती बस ्थानक ते शिंगणापुर असे जाणारे रोडवरील सर्व सीसीटीव्ही कँमेरे यांची पाहणी केली असता त्यांना एका सीसीटीव्ही फूटेज मध्ये सदरचा इसम हा एका दुकाना मध्ये खरेदी करत असताना दिसुन आला.पैसे देतेवेळी सदर इसमाने खिशातुन एका ज्वेल्सचे नाव असलेला पाउच बाहेर काढला. त्या मिळाले सुगावावरुन सदर आरोपी प्राथमिक माहिती मिळाली .

 सदरचा आरोपी हा कत्याणी मंदीर कळंबा परिसरात येणार असलेची गोपणीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाली. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला असता कत्याणी मंदीर समोर कळंबा येथे सदर इसमास मोटर सायकल सह ताबेत घेतले, त्याचेकड़े चौकशी केली असता त्याने प्रथम उडवा उडवीचे उत्तरे दिली. परंतु त्याचेकड़े अधिक सखोल तपास केला असता त्याचा गुन्हयात सहभाग असलेचे निष्पण झाले. त्यास नांव पत्ता विचारता त्यांने त्याचे नांव मयुर विठठल सुतार वय 31 सध्या रा. गणेश नगर शिंगणापुर रोड, कोल्हापूर मुळ रा.नेवसे वस्ती पाडेगांव जि.सातारा असे सांगितले. त्याचे कब्जात मिळन आलेली 60,.000/- रु किंमतीची होंडा कंपणीची एस पी 125 मॉडेलची क्र .एम एच 09 जी सी 0253 ही मोटर सायकल दोन पंचासमक्ष जप्त करणेत आली. सदरची मोटर सायकल व आरोपी यास पुढ़ील तपास कामी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांचे ताबेत देणेत आले.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद् पंडीत सो, अपर पोलीस अधीकषाक, श्री.जयश्री देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक,रविंद्र कळमकर, सहा.पोलीस निरीक्षक, श्री सागर वाघ ,पोरलीस अंमलदार सुरेश पाटील, संजय कुंभार, सागर माने, संजय हुंबे, रामचंद्र कोळी यांनी कैली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post