सह्याद्री अकॅडमी स्पोर्ट्स वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात साजरा.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी  : भरत शिंदे

सह्याद्री तायक्वांदो अकॅडमी स्पोर्ट्स रुकडी माणगाव आणि सह्याद्री स्केटिंग अकॅडमी रुकडी माणगावला यशस्वी वाटचालीचे अकरा वर्षे पूर्ण झाले त्याबद्दल पंचगंगा चौक नागोबा मंदिर हॉल रुकडी येथे केक कापून अकॅडमी चा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामध्ये मागील गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या राज्य व राष्ट्रीय खेळामध्ये ज्या खेळाडूंनी मेडल प्राप्त करून यश मिळवले त्या खेळाडूंचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालकांनी आपली उपस्थिती दाखवली. त्यामध्ये काही पालकांचे व मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाले. मनोगतामध्ये सांगण्यात आले की आजच्या पिढीला तायक्वांदो किक बॉक्सिंग व स्केटिंग शिकणे महत्त्वाचे आहे. खरे तर मुलींच्या बाबतीत बघायला गेले तर तायक्वांदो किक बॉक्सिंग हा खेळ स्वतःच्या संरक्षणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. त्यांनी तो शिकला पाहिजे असे सांगण्यात आले. तसेच याच सह्याद्री तायक्वांदो अकॅडमी मध्ये तयार तयार झालेली अतिग्रे गावची कन्या सायली प्रकाश सूर्यवंशी हिने दिल्ली येथे झालेल्या सीबीसी नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत सिल्वर मेडल व लातूर येथे झालेल्या शालेय शासकीय राज्यस्तरीय स्पर्धेत 17 वर्षाखालील वयोगटात व 55 किलो खालील वजनी गटात ब्रॉंझ मेडल मिळवून यश संपादन केल्याबद्दल अतिग्रे ग्रामपंचायतच्या वतीने सायली सूर्यवंशी हिचा  26 जानेवारी रोजी भव्य स्वरूपात सत्कार घेण्यात आला. त्यावेळी सायलीला लाभलेल्या मार्गदर्शक यांचे कौतुक करण्यात आले. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा वेळी काही खेळाडूंनी आपली साहसी प्रात्यक्षिके करून दाखवली.

अशी ही चांगली धाडसी व नीर व्येसनी पिढी  घडवण्याचे काम सह्याद्री अकॅडमी करत आहे.

या अकॅडमीचे अध्यक्ष निलेश परीट सर. सचिव आश्लेषा परीट मॅडम. प्रशिक्षक यासीन मुल्ला सर यांचे या सर्वच यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन लाभल्यामुळे त्यांचे रुकडी व रुकडी पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रूकडी गावचे माजी उपसरपंच शामूवेल लोखंडे. पत्रकार रोहन साजणे. संजय खोत व परीट समाजाचे अध्यक्ष विठ्ठल परीट यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे आभार अकॅडमीचे अध्यक्ष निलेश परिट सर यांनी मानले 

Post a Comment

Previous Post Next Post