मोठी बातमी : जिल्हा भुमि अभिलेख मधील क्लास वन ऑफिसर15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.

 

          क्लास वन ऑफिसर.सुदाम जाधव 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर -तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी तक्रारदाराकडुन 15 हजारांची लाच घेताना जिल्हा भुमि अभिलेख मधील क्लास वन ऑफिसर सुदाम दादासो जाधव (वय 50 .रा.पुण्यप्रवाह सोसायटी.नागाळा पार्क) आणि त्यांचा चालक उदय लगमाना शेळके (वय 40.रा.कणेरीवाडी). यांना 15 हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली.

                          उदय शेळके 

तक्रारदार हा पन्हाळा तालुक्यातील असून त्यांची वडीलोपार्जित शेतजमीन आहे.त्या जमिनीला चुलत चुलत्याचे नाव लागले होते.ते कमी करण्यासाठी तक्रारदार यांनी पुणे येथील उपसंचालक भुमिअभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला होता.पुणे येथील कार्यालयाने तो अर्ज कोल्हापूर येथील जिल्हा भुमिअभिलेख कार्यालयाकडे वर्ग केला होता.त्या अर्जाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी चालक शेळके यांच्या मध्यस्थीने लाचेची मागणी केली होती.तडजोडी नंतर 15 हजार देण्याचे ठरले.

दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.याची लाचलुचपच्या पथकाने पडताळणी करुन सोन्या मारुती चौक येथे असलेल्या जिल्हा भुमिअभिलेख कार्यालयात सापळा रचून 15 हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली.जिल्हा भुमिअभिलेख कार्यालयाकडे आलेल्या अशा अर्जावर आता प्रर्यत सुदाम जाधव यांनी अशा पध्दतीने निकाल दिल्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा किती प्रकरणात त्यांनी निकाल दिला याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.त्या कार्यालयात जाऊन अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित असलेल्यानी कानावर हात ठेवून आम्हाला माहिती नाही.आम्ही जेवायला गेलो होतो.त्या दरम्यान कारवाई झाली असे काही जण म्हणत होते.

या कारवाईत वरिष्ठ अधिकारी सापडल्याने त्या कार्यालयात मोठी खळबळ उडाली.ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.अमोल तांबे ,अप्पर पोलिस अधीक्षक मा.डॉ.शितल जानवे ,अप्पर पोलिस अधीक्षक मा.विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपचे पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे यांनी पदभार स्विकारल्या पासून आता प्रर्यत 24 जणांवर लाचेची कारवाई केली असून त्यापैकी 6 जण क्लास वन ऑफिसर आहेत.या नवीन चालू वर्षातील 1ली.कारवाई आहे.तसेच जर कोणी लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत विभागाकडे संपर्क साधावा.असे आवाहन या विभागाने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post