अल्पसंख्याक समाजाला संविधानीक हक्क व संरक्षण सरकारकडून कधी मिळणार-फिरोज मुल्ला (सर)


           


प्रेस मीडिया लाईव्ह :

फिरोज मुल्ला सर 

    पुणे.. पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने १८ डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त अल्पसंख्याक समाजाचे हक्क व संरक्षण देण्यासाठी सरकारने कमी न पडता र्कतव्यदक्ष राहवे असे निवेदन जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख साहेब यांना  संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांनी दिले

        अल्पसंख्याक हक्क दिना  निमित्त तो दिवस सरकारच्या वतीने शासकीय अधिकारी व सरकार फक्त एकच दिवस साजरा करून अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करत आहे  मायबाप सरकार अल्पसंख्याक समाजापर्यंत त्याचे हक्क पोहचविण्यासाठी व संरक्षण देण्यासाठी असमर्थ ठरत आहे.अल्पसंख्याक समाजामध्ये मुस्लिम समाजाची संख्या अधिक आहे आणि हा समाज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, या सर्व सुखसोयी पासून मागास राहिला आहे संविधानामध्ये मागास समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आनण्यासाठी मुलभूत अधिकार दिले आहेत आणि ते सरकारने शक्तीने राबविले पाहिजे पण सरकारची इच्छा शक्ती दिसत नाही मुस्लिम समाज अती मागास असल्याचे अहवाल सच्चर समीती,रंगनाथ मिश्रा समीती, आब्दुल रहेमान कमीटी या सर्व समीतीने सर्वे करून खरी मुस्लिम समाजाची मागास परीस्थिती सरकारच्या समोर ठेवली आहे पण सरकार या समाजाकडे जानीवपुर्वक र्दुलक्ष करीत आहे आणि देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब सतत बोलतात "मै भारत देश को महासत्ता बनाना चाहता हुँ" परंतु देशातील शोषित पिडीत मागास समाजाला मुख्य प्रवाहात आनणार नाही तोपर्यंत भारत देश महासत्ता होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.

       मायबाप सरकार देश प्रगती कडे न नेहता निवडून आलेले लोकप्रतिनिधी मंत्री मताच राजकारण करत जातीय समीकरण घट्ट करत स्वतःच्या स्वार्थापोटी जाती जातीमध्ये विभाजन करून सत्ता उपभोगत आहे यामुळे देश निव्वळ आदोगतीकडे चालला आहे 

         छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले कुठल्याही समाजावर अन्याय होऊ दिला नाही त्यांच्या राज्यात मुस्लिम समाजावर कधीच अन्याय झाला नाही विशेष म्हणजे सैन्य दलामध्ये मुस्लिम मावळ्यांना प्रमुख पदे देऊन मुख्य प्रवाहात आणून आपल्या सोबत घेतली होती.

          क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्वांना शिक्षण देऊन शिक्षणाची क्रांती केली घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये सर्व जातीच्या समुहाला प्रगतशील करण्यासाठी अधीकार व हक्क दिले आहेत परंतु  त्या अधिकाराची व हक्काची अंमलबजावणी सरकार शक्तीने राबवत नाही हे देशातील जनतेचे र्दुदैव आहे.

           सर्व महापुरुषांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन देश हिताचा मानव हिताचा राष्ट्रीय   ऐकतेचा विचार केला विशेष म्हणजे मुस्लिम समाजाबद्दल कधीच द्वेष ठेवला नाही परंतु हे सरकार त्यांच्या प्रतीमेचे पुजन करत पण त्यांच्या मानवतावादी विचाराला पद्धतसीर बाजूला ठेवत जातीपातीच राजकारण कस होईल याकडे मात्र लक्ष जास्त देत आहे "एकाला आंगासी दुसऱ्याला जांगास " असी गत सरकार करत आहे.

         अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करत आसताना पहिले तर सरकारने विश्वासर्हाता दाखवली पाहिजे आणि संविधानीक हक्क दिले पाहिजे बहुसंख्येने असलेला भारतीय मुस्लिम समाजाला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय,आर्थिक,संरक्षण  आरक्षण दिले पाहिजे आणि संविधानाच्या अधिकारांची शक्तीने प्रत्येक राज्यात जिल्ह्यात शहरात मुस्लिम समाजाचे संरक्षण आरक्षण देऊन सक्षमीकरण केले पाहिजे या सर्व अधिकारा पासून वंचित ठेवून अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करणे म्हणजे या समाजाची थट्टा करण्यासारखे आहे म्हणून सरकारने सर्वपरी शक्तीचे प्रयत्न करून अल्पसंख्याक समाजाची प्रगती करून देशहितासाठी महत्त्वाचे पाऊल उचलावे यावेळी निवेदन देताना प्रदेश महिला कार्यध्यक्षा सौ.सिंधुताई तुळवे, असलमभाई वाटार ,पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post