अर्चना राऊत यांच्या प्रयत्नांना यश विकास नगर,एम.बी कॅम्प या भागात महापालिकेतर्फे आरोग्य केंद्र आणि प्रस्तुतीग्रह होणार चालू

  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सामाविष्ट झाल्यापासून पहिल्यांदाच एम.बी कॅम्प, विकास नगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्रस्तुती गृहला मान्यता

प्रेस मीडिया लाईव्ह 

अनवर अली शेख :

पिंपरी चिंचवड, दि. १३, किवळे विभागातील एम.बी कॅम्प,विकास नगर,बापदेव नगर,भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रस्तुतीग्रह जिजाऊ डिस्पेंसरी चालू होणार असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याकडून पत्राद्वारे  कळविण्यात आले आहे,

अर्चना राऊत यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना वारंवार पत्रव्यवहार करून हे यश मिळवले आहे,अर्चना राऊत यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात प्राथमिक उपचार केंद्र प्रस्तुतीग्रह आणि जिजाऊ डिस्पेंसरी याची मागणी केली होती तसेच पत्रात नमूद केले होते की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यापासून या प्रभागात महापालिकेचे प्रथामिक आरोग्य केंद्र  आणि प्रस्तुती ग्रह,जिजाऊ डिस्पेंसरी चालु करण्यात आलेली नाही,त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे, एम.बी कॅम्प आणि विकास नगर, बाप देव नगर,आदर्श नगर , या भागात भरपूर गोरगरीब असाह्य लोक वास्तव्यास आहे. त्यांना आरोग्य सेवा घेण्यासाठी खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या प्रभागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्रस्तुतीग्रह तसेच जिजाऊ डिस्पेन्सरी सेंटर चालू करावे अशी मागणी अर्चना राऊत यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली होती आणि आज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी पत्राद्वारे आरोग्य खात्याला आदेश दिला आहे की या भागात जागेची पाहणी करून लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रस्तुती ग्रह, जिजाऊ डिस्पेंसरी चालू करावी.

Post a Comment

Previous Post Next Post