भारतीय मजदूर संघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री गिरीशजी अवस्थी यांचे निधन


प्रेस मीडिया लाईव्ह :

भारतीय मजदूर संघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री गिरीशजी अवस्थी ( कानपूर) यांचे शनिवार दिनांक २३ डिसेंबर २३ रोजी सायंकाळी पाच वाजता कानपूर येथे हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन (वय ८९) होते. 

बालपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. अनेक वर्ष ते संघाचे प्रचारक होते.अत्यंत कडक शिस्तीचे व देशभर कार्यकर्ते व कामगार जोडणारे मास लीडर म्हणून त्यांची ख्याती होती.भारतीय मजदुर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांचे सहकारी होते.

गिरीश अवस्थी हे संरक्षण उद्योगातून सेवानिवृत्त झालेले होते. त्यांनी संरक्षण उद्योगात भारतीय मजदूर संघाची संघटना स्थापन करून प्रभावी करण्यात भरीव योगदान दिले.भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे अध्यक्ष, महामंत्री आदी विविध जबाबदार सांभाळताना,भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय उपाध्यक्ष,आणि कटक ( ओरिसा ) येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली.संरक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर करून दिल्या.प्रामुख्याने सेवानिवृत्ती वय ६० करणे,बोनस वरील मर्यादा हटवणे, महागाई भत्ता वाढ या होत.

कानपूर येथील गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या भैरो घाटावर गिरीश अवस्थी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने भारतीय मजदूर संघाची व कामगार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.  

भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 



सचिन मेंगाळे सरचिटणीस 

अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ 

9422037029 

sachinmbms@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post