ज्ञानयोगिनी गंगाबाई माईसाहेबांची पुण्यभूमी संस्कारशील - प्रा.प्रवीण दवणे



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी 

धाग्याला धागा विणणाऱ्या,जीवाला जीव लावणाऱ्या या वस्त्रनगरीतील पुण्यभूमीत ज्ञानयोगिनी श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये संस्कारशील विद्यार्थिनी घडतात. आपल्या आई वडिलांच्या विद्यापीठात तयार होणाऱ्या या विद्यार्थीनींचे मन समृद्ध करणाऱ्या व माणूस बांधणारे कलावंत निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या संस्थेच्या सर्व पदाधिकारी,प्रशासन व अध्यापकांचे कौतुक आहे.स्पर्धा फक्त जिंकण्यासाठी नसून हरणं साजरा करायला शिकवण्यासाठी असते. संघर्ष हाच जीवनाला पैलू पाडतो. स्वतःवर आलेली प्रतिकूल परिस्थिती जगायला शिकवते असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, कवी, गीतकार प्रा.प्रवीण दवणे यांनी केले. 

येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित श्रीमंत गंगाबाई माईसाहेब यांच्या 66 व्या पुण्यतिथी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री.ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा होते. 

श्रीनिवास बोहरा आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, इचलकरंजी नगरीत मुलींसाठी स्वतंत्र शाळा श्रीमंत गंगाबाई माईसाहेबांनी उभी करून महिलांसाठी शिक्षणाबरोबरच खेळ, आरोग्य उपलब्ध करून दिले. त्याचा पुरेपूर लाभ विद्यार्थीनींनी घेऊन विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवावा.

प्रारंभी गंगाबाई माईसाहेबांच्या पुतळ्याचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस.एस. गोंदकर यांनी केले.अहवाल वाचन विभाग प्रमुख सौ. व्ही.के.पाटील यांनी केले तर पाहुण्यांची ओळख उपप्राचार्य आर..एस.पाटील यांनी करून दिली.यावेळी विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.यासाठी देणगी दिलेल्या एस.एस.शिंदे,एन.एम.कांबळे,पी. ए.कोल्हापुरे,आर.बी.पाडवी,पी. डी.कुलकर्णी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.आभार पर्यवेक्षक व्ही.एन.कांबळे यांनी मानले. सुत्रसंचलन सौ. व्ही.डी.रावळ यांनी केले.कार्यक्रमास स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर, विश्वस्त अहमद मुजावर,उपमुख्याध्यापिका सौ.एस.एस.भस्मे,पर्यवेक्षक एस. व्ही.पाटील,वेदश्री दवणे, वंदना उपळेकर, हायस्कूलची जी.एस.संस्कृती आबाळे, उप जी.एस. श्रावणी भोसले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post