आयटीआय परिसरात दोन ठिकाणी केलेलया घरफोडीत चोरट्यांनी केले 12 तोळे सोने लंपास

 



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- शहरात असलेल्या आयटीआय परिसरात असलेल्या  गुरुप्रसादनगरात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून पाच लाख किंमतीचे 12 तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार शुक्रवारी रात्री उघकीस आला असून  या घटनेने  परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.अधिक माहिती अशी की ,शिशिर पोतदार हे आपल्या कुंटुबिया सोबत रहात असून ते सेवानिवृत्त आहेत.ते दोन दिवसा पूर्वी कामानिमीत्त पुण्याला गेले होते.परत आल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले.आत जाऊन पाहिले असता कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले .आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्ष्यात येताच त्यांनी जुना राजवाडा पोलिसांना चोरी झाल्याची माहिती दिली.चोरट्यांनी पोतदार यांच्या घरातनं 8 तोळे सोने लंपास केले आहे.तसेच या परिसरात रहात असलेले सुर्यकांत सुटाप्पा पाटील हे पत्नी समवेत मुलीकडे गेले होते.परत आल्यावर आपल्या घरी चोरी झाल्याचे निदर्शनास आले.चोरट्यांनी चार तोळे सोनेसह सात हजार रोख रक्कम लांबवली आहे.

त्यांनीही या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली.या झालेल्या चोरीची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके  यांच्यासह जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली.श्वानपथक आणि ठसे तद्न्यानी चोरट्यांचा माग काढ़ण्याचा प्रयत्न केला पण ते जागेवरच घुटमळले.

Post a Comment

Previous Post Next Post