कर्जत हद्दीतून एक इसमाकडून 2 देशी पिस्टल व 5 जिवंत काडतूस स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत करून एक आरोपीस अटक केले .



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी सुनील पाटील

कर्जत - खालापूर विभागात स्थानिक गुन्हे शाखेची एक आठवड्यात दुसरी कामगिरी दिनाक 21/12/2023 रोजी सायंकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ/राजा पाटील, यांना गुप्तबातमीदाराकडून गोपनीय खबर मिळाली कि, एक इसम कर्जत येथील चारफाटा येथे देशी पिस्टल विक्री करण्याकरीता येणार असल्याची विश्वासनिय खबर प्राप्त झाली. त्यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली. त्यांनी सहा. पोलीस निरीक्षक/नागेश कदम, सफौ/राजा पाटील, पोह/संदीप पाटील, पोह/राकेश म्हात्रे, पोह/यशवंत झेमसे असे तपास पथक तयार केले. सदर पथकाने चारफाटा कर्जत या परिसरात सापळा रचला. त्यावेळी मिळालेल्या खबरीनुसार सदरचा इसम कर्जत येथील चारफाटा या परिसरात पथकास दिसून आला. सदर इसमास पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी 02 पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ 02 देशी पिस्टल व 05 जिवंत काडतूस मिळून आले. सदर इसमास 02 देशी पिस्टल व 05 जिवंत काडतूस सह ताब्यात घेण्यात आले.

सदर बाबत कर्जत पोलीस ठाणे येथे कॉ.गु.र.नं. 315/2023 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 25,3, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135,37(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात आरोपित नामे सतीश अनिल क्षेत्रे वय-29 वर्षे रा.पी.वाय. थोरात मार्ग, रूम नं.11 चाळ नं.11 टिळक नगर चेंबूर, मूळ रा. रूम नं.201, सद्गुरू मालवणी तडका हॉटेल जवळ, उलवे, ता. उरण जि. रायगड यास अटक करण्यात आली. सदर आरोपीकडे सदर पिस्टल व काडतूस कोठून व कश्यासाठी आणले, याबाबत सहा. पोलीस निरीक्षक नागेश कदम व पथक तपास करीत आहे.

सदरची कामगिरी रायगड जिल्हयाचे मा. पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक, अतुल झेंडे साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे अधिपत्याखाली सहा. पोलीस निरीक्षक / नागेश कदम, सफौ/राजेश पाटील, पोह/संदीप पाटील, पोह/राकेश म्हात्रे, पोह/यशवंत झेमसे यांनी केली आहे.

जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय

Post a Comment

Previous Post Next Post