‘आगामी २०२४ च्या निवडणुकीत संविधान टिकवायचे असेल तर भाजपाचा संपूर्ण पराभव होणे गरजेचे आहे.’’ - सुभाष वारे, संविधान अभ्यासक

 


प्रेस मीडिया लाईव्ह :


   पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ७४ व्‍या संविधान दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन उपस्थित सर्वांनी केले व कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी ज्येष्ठ संविधान अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांचे व्‍याख्यान आयोजित करण्यात आले होते.

     



कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत हालआपेष्ठा सहन करून शिक्षण पूर्ण करून बॅलिस्टर पदवी घेतली. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी दिली व त्यानुसार त्यांनी अहोरात्र कष्ट करून २ वर्षे ११ महिने व २६ दिवसांनी म्हणजे २६ नोव्‍हेंबर १९४९ रोजी संविधानाचा मसुदा राष्ट्रपतींना सुपूर्त केला.’’   

     

यावेळी बोलताना प्रा. सुभाष वारे म्हणाले की, ‘‘आगामी २०२४ च्या निवडणुकीत संविधान टिकवायचे असेल तर भाजपाचा संपूर्ण पराभव होणे अत्यंत गरजेचे आहे. संविधान म्हणजे जीवंत काँग्रेस चळवळीचा आदर्श आहे. संविधान दिन साजरा करण्याचा खरा हक्क काँग्रेस पक्षाचाच आहे. भारतातील सरंजामशाही, जाती पाती, पुरोहित वाद यापासून स्वातंत्र्य हवेच होते परंतु इंग्रजांच्या गुलामगीरीतून मुक्तता व्‍हावी यासाठी प्रयत्न व्‍हायला हवे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. अस्पृश्यतेच्या घटनेबाबत १७ वे कलम चवदार तळ्याच्या ठिकाणापासून सुरू झाले. शैक्षणिक आरक्षण, शासकीय नोकऱ्यांचे आरक्षण याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी योग्यरित्या आखणी केली आहे. सामान्य माणसाने आपल्याशी निगडीत प्रश्नांना प्राधान्य देवून उद्याच्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी लोकसहभाग -



     वाढवला गेला पाहिजे. संविधानाचे वैशिष्ट म्हणजे रक्तपाताशिवाय क्रांती साकारणे हे आहे.’’

     

यानंतर २६/११ मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन पटांगणात करण्यात आला. यावेळी मेणबत्त्या प्रज्वलीत करून सर्व उपस्थितांनी शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर काल जम्मु खोऱ्यातील राजोरी येथे दहशतवादी हल्ल्यात लष्करी अधिकारी शहिद झाले त्यांनाही २ मिनिटे मौन बाळगून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

     यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, लता राजगुरू, रफिक शेख, अजित दरेकर, संगीता तिवारी, पुजा आनंद, नीता रजपूत, प्रियंका रणपिसे, ॲड. राजश्री अडसूळ, सतिश पवार, द. स. पोळेकर, सुजित यादव, रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे, अक्षय माने, हेमंत राजभोज, राजू ठोंबरे, अजित जाधव, रवि आरडे, हरिष यादव, भरत सुराणा, समिर शेख, नंदलाल धिवार, लतेंद्र भिंगारे, उमेश ठाकुर, ज्योती चंदवेळ, रजिया बल्लारी, छाया जाधव, नलिनी दोरगे, सचिन सुडगे, सुंदर ओव्हाळ, प्रकाश पवार, अभिजीत गोरे, समिर गांधी, सुरेश नांगरे, स्वप्निल नाईक, ज्ञानेश्वर निम्हण, सनी रणदिवे, मारूती माने, आशुतोष शिंदे, रवि ननावरे, विठ्ठल गायकवाड, संजय डोंगरे, राज अंबिके, मुन्ना खंडेलवाल, शिवा भोकरे, अनिल पवार, संजय मानकर  आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित यादव यांनी केले तर आभार विनोद रणपिसे यांनी मानले. 

Post a Comment

Previous Post Next Post