महापालिकेच्यावतीने शहरातील 2618 दिव्यांग बांधवांना अनुदान वाटप

 दिव्यांग बांधवांच्या बँक खातेवर रू.1 कोटी 87 लाख जमा



प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी :  संभाजी चौगुले : 

कोल्हापूर  : शहरातील रहिवासी असलेल्या पात्र दिव्यांगांना महापालिकेच्यावीने दरवर्षी दिव्यांग कल्याण कृती आराखडा तयार करून विविध योजना व अनुदान देण्यात येते. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील मंजुर आराखड्याप्रमाणे शहरातील 2618 दिव्यांग बांधवांना महापालिकेच्या निधीमधून निधी अदा करण्यात आलेला आहे. 

दिव्यांग बांधवांना महानगरपालिका दरवर्षी 5 टक्के निधी राखीव ठेवते. या राखीव निधीमधून पात्र दिव्यांगांना हे अनुदान देण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेकडे अर्ज प्राप्त झालेल्या 2618 दिव्यांग बांधवांपैकी 70 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असणा-या दिव्यांगांना दरमहा रू.1500/- प्रमाणे व 70 टक्के पेक्षा कमी दिव्यांगत्व असणा-या दिव्यांगांना दरमहा रू.1000/- प्रमाणे अनुदान देण्यात आले आहे. सदरचा निधी संबंधित दिव्यांगांच्या बँक खात्यावर आर.टी.जी.एस प्रणालीद्वारे जमा करण्यात आलेला आहे. त्याकरिता पहिल्या टप्प्यातील सहा महिन्यांचे रक्कम रू.1 कोटी 87 लाख 74 हजार इतके अनुदान दिव्यांग बांधवांच्या बँक खातेवर जमा करण्यात आले. 

यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अति-आयुक्त केशव जाधव, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post