बाबासाहेबाची उपकाराची उतराई करायचे असेल तर प्रत्येक भारतीयांनी आप आपल्या घरात संविधान साक्षरता करणे आवश्यक :- प्रबोधनकार डॉ धनंजय भिसे.

 भारतीय संविधान सन्मान रॅली संयोजन समितीच्या वतीने संविधान रॅली संपन्न, नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने अन्नदान वाटप.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

चंद्रशेखर पात्रे : 

देहूरोड दि. २८:- ज्या दिवशी भारतात भारतीय संविधान रुजू झाली त्याच दिवशी देशातील जातीपाती गाडल्या गेल्या ते चमत्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केला ते आपण मुक्तपणे संचार करतो हे बाबासाहेबांचे संविधानामुळे करत आहोत त्यामुळे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत त्यांचे उपकाराची उत्तराई करायचे असेल तर प्रत्येक भारतीयांनी आपापल्या घरात संविधान साक्षरता करणे आवश्यक आहे अशी अपेक्षा परिवर्तनवादी प्रबोधनकार डॉ धनंजय भिसे यांनी केली. देहूरोड शहर संविधान सन्मान रॅली समितीच्या वतीने आयोजित भारतीय संविधान सन्मान रॅलीत डॉ धनंजय भिसे बोलत होते. प्रारंभी देहूरोड शहराचे ख्यातनाम सामाजिक नेते तथा श्रीमती नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वरसेठ अगरवाल यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय देहूरोड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून व दैनिक विशाल संविधानांचे सहसंपादक अशोक कांबळे यांच्या हस्ते संविधान प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्यात आले. 

धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के.एच.सूर्यवंशी यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन करुन सर्वांना प्रतिज्ञा दिली. यावेळी सामाजिक नेते संजय धुतडमल, प्रकाश कांबळे- रुईकर, विजय पवार ,तनवीर मुजावर यांनी संविधानावर आपले विचार व मनोगत व्यक्त केले तदनंतर रथातून हिंदु, मुस्लिम, शीख,ईसाई, बौद्ध, जैन धर्माची वेषभूषा केलेली लहान मुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा केलेले प्रकाश कांबळे (रुईकर) यांची सजावट केलेल्या रथातून भव्य सन्मान रॅली देहूरोड शहराच्या बाजार पेठेतील प्रमुख मार्गावर निघून सवाना उपहारगृह, वृंदावन चौक, महात्मा फुले मंडई सुभाषचंद्र बोस चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज व सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा व संविधान दिनाच्या जयघोषाने देहूरोड शहर दुमदुमून गेले पुन्हा कार्यक्रम स्थळी उडान पुलाखाली मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी भीम गीतकार प्रभाकर निकम यांच्या संचलना खाली प्रसिद्ध भीमशाहीर सुदेश कांबळे, पंढरीनाथ गाडे सुधाकर गबाळे या भीमशाहीर तसेच भीम गीतकार प्रभाकर निकम यांचे अशी मी भिमाची शान हा भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. या रॅलीच्या कार्यक्रमाची जबाबदारी समितीच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे मुख्य समन्वयक म्हणून तर के .एच. सूर्यवंशी, अमोल नाईकनवरे, रामदास ताटे, प्रभाकर निकम, प्रकाश कांबळे, दीपक चौगुले, चंद्रशेखर पात्रे, बाबू हिरमेटकर,रज्जाक शेख, संजय आगळे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी ईश्वरशेठ अगरवाल, सामाजिक नेते संतोष म्हस्के, संंजय शेंडे, धर्मपाल तंतरपाळे, सिदार्थ चव्हाण, माई बालभवन चे संचालक मधुकर इंगळे, जावेदभाई शेख, सारीकाताई नाईकनवरे , सोनी रामनानी, एम डी चौधरी, राजाराम(दादा) अस्वरे, कृष्णा दाभोळे, मिक्की कोचर, विजय पवार, मोजेस दास, रमेश जाधव, जावेद शेख, अरविंद गायकवाड, बाबु कोरे , श्रीमंत शिवशरण सामाजिक कार्यकर्ते  यांनी ह्या संविधान सन्मान रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्धल पंचशील उपरणे, ग्रंथ व पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.  

या रॅली मध्ये बाबु टेक्केल, इरप्पा कोलटल्या, बाबु नायडू, चंद्रकांत गायकवाड, रोहन गायकवाड, सुभाष चंडालिया, पास्टर राजेंद्र कदम,प्रकाश साबळे, शशिकांत सप्पागुरू,मलिक शेख, सिद्धांत गायकवाड, आशाताई गायकवाड,पुष्पा सोनवणे, रेश्मा कांबळे, प्रिती कांबळे,शिल्पा शेंडे, त्रिशला अल्हाट, अश्विनी गायकवाड, प्राची नाईकनवरे, व महिला आघाडी च्या अन्य महिला, पुरुष व देहूरोड शहर व पंचक्रोशीतील असंख्य भारतीय नागरिक या रॅली मध्ये उपस्थित होते. यावेळी नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद चौक येथील रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्था या रिक्षाचालक बांधवांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post