मिरजेत स्व. अहमद बाशा चौक कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळाच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रम संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मिरज प्रतिनिधी  : धनंजय हलकर शिंद

मिरज येथील स्व. अहमद बाशा चौक कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळाच्यावतीने महंमद पैगंबर जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व काँग्रेसचे युवक नेते विशाल प्रकाशबाबू पाटील, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरिक्षक सुभाष पाटील, महापालिकेच्या नगरसेविका नर्गिस सय्यद, आजगर शरिकमसलत, सलाउद्दीन बेपारी, रिक्षा संघटनेचे जावेद शिकलगार, फुटबॉल संघटनेचे शब्बीर शेख आदि उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवर पाहुण्यांचा सत्कार मंडळाच्या पदाधिकायांच्या करण्यात आला. यावेळी चार ते पाच हजार नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संयोजन शकील शेख, गुलाम रसूल शेख, युसुफ शेख, रवि पाटील, कृष्णा गवळी, महेबुब शेख, तौफिक शरीकमसलत, महंमद शेख, अहमद शेख, जुनेद शेख आदिंनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post