भारती विद्यापीठच्या न्यू लॉ कॉलेजचे मूट कोर्ट कॉम्पिटिशनमध्ये यश



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहाव्या सुराणा अँड सुराणा मूट कोर्ट कॉम्पिटिशन मध्ये विजेतेपद पटकावले.पर्यावरणविषयक कायदे विषयावर ही स्पर्धा पंजाब विद्यापीठाच्या वतीने चंदीगड येथे झाली.

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे अथर्व तिवारी,इशिका,अरुंधती जी. हे विद्यार्थी सहभागी झाले.अथर्व तिवारी याला 'बेस्ट ओव्हरऑल स्पीकर' चा आणि 'बेस्ट स्पीकर इन फायनल राउंड' चा किताब इशिकाला मिळाला.या विद्यार्थ्यांना चौथे 'बेस्ट मेमोरियल अवॉर्ड' देखील मिळाले.देशातून ३२ संघ सहभागी झाले.संयोजक प्रीतम सुराणा तसेच भारती विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि  न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे,उपप्राचार्य डॉ.ज्योती धर्म  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post