पुसेसावळी प्रकरणातील पीडितांना शासनाने भरघोस आर्थिक मदत करावी..

दोषी लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मदनी चारिटेबल ट्रस्ट व जमियते उलमाये हिंद सांगली यांची मागणी.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

युसुफ तासगावे : 

 पुसेसावळी प्रकरणातील पीडितांना शासनाने भरघोस आर्थिक मदत करावी तसेच दोषी लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मदनी चारिटेबल ट्रस्ट व जमियते उलमाये हिंद सांगली तर्फे कॅबिनेट मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री आमदार शंभूराजे देसाई, पूसेसावळी मतदारसंघाचे आमदार श्री. बाळासाहेब पाटील तसेच सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांचेकडे मागणी केली आहे .

सातारा पोलीस प्रशासनाने पुसेसावळी प्रकरणात गुन्हेगारांना अटक करुण जी तत्परता दाखवली आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे. *तरीसुद्धा मुळ मुद्दा जो राहतो तो म्हणजे या  प्रकरणाचे भांडवल करुन ज्या लोकांनी तरुणांची माथी भडकावून अल्पसंख्याक समाजावर भ्याड हल्ला करणेस प्रवृत्त केले त्या सर्व लोकांवर वेळेवर कारवाई झाली नाही तर समाज महाराष्ट्र पोलिस प्रशासनावरील विश्वास गमावेल*. तसेच या लोकांचे कदाचित संपूर्ण महाराष्ट्रात जाळपोळ, दंगल घडवण्याचे मनसुबे पूर्ण होतील. अशाप्रकारे या सर्व लोकांवर राज्य शासन, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी योग्य तो समन्वय साधून कठोर कायदेशीर कारवाई करणे नितांत गरजेचे आहे.


भ्याड हल्यात मृत्यु पावलेल्या युवकांच्या कुटुंबांना शासनातर्फे भरघोस आर्थिक मदत केली गेली पाहिजे. तसेच धार्मिक स्थळे, दुकाने, घरे व वाहने यांचे जे काही या दंगलीमध्ये नुकसान झाले आहे, त्यांची सुद्धा शासनाने नुकसान भरपाई किंवा आर्थिक मदत करण्यात यावी तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्यरीतीने कारवाई करण्यात यावी आणि महत्वाच्या फुटेजेस, इतर पुरावे आणि घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची सुरक्षा करून न्यायालयात सादर करावेत अशी मागणी आदरणीय कॅबिनेट मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री आमदार शंभूराजे देसाई यांना करण्यात आली यावेळी त्यांनी सर्व दोषींवर कोणताही भेदभाव न करता करण्यात येत असल्याची तसेच पिडीत कुटुंबांना शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठीच्या प्रस्तावावर पाठपुरावा चालू असल्याचे सांगितले.

सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी सुद्धा तत्परतेने कारवाई चालू असून जवळपास 35 संशयितांना अटक केल्याचे तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे तपासून अकाउंट हॅक करणाऱ्यांवर सुद्धा पूर्वीप्रमाणेच पूसेसावळी प्रकरणात सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. योग्यरीतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे पूसेसावळी मतदारसंघाचे आमदार श्री. बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा ग्वाही दिली

या सर्वांची तसेच पूसेसावळी दंगलीतील पिडीत कुटुंबातील नातेवाइकांची प्रत्यक्ष भेट घेवून मदनी चारिटेबल ट्रस्ट व जमियते उलमाये हिंद सांगली तर्फे वरील मागण्या करण्यात आल्या. यावेळी सांगलीचे सुफियान पठाण, हाफिज सद्दाम सय्यद, इम्रान बेग, ॲड. असिफ अत्तार, मौलाना साहिल, सिकंदर जमादार, अफजल मोमीन तसेच कराड मदनी ट्रस्टचे उमर फारुक सय्यद तसेच पुसेसावळीचे शाहरुख बागवान सुद्धा उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post