अनंत चतुर्दशी रोजी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका यंत्रणा सज्ज :- आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे


प्रेस मीडिया लाईव्ह : 

   इचलकरंजी :   महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या आवाहनास अनुसरून गुरुवार दि. २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी  इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहापूर खण येथे यंत्रणा सुसज्ज ठेवणेत आलेली आहे. 

         शहापूर खण येथे सार्वजनिक मंडळांच्या गणेश  मुर्तीं विसर्जनाची व्यवस्था  शहापूर हायस्कूल मागील विसर्जन स्थळ , ओपन जीम जवळ आणि  बालाजी नगर पद्मा पॅलेस समोर अशा तीन ठिकाणी अद्ययावत  क्रेनच्या सुविधेसह विसर्जनाची व्यवस्था करणेत आलेली आहे.

 अनंत चतुर्दशी रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन व्यवस्थेसाठी  महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख, सर्व इंजिनिअर, स्वच्छता निरिक्षक, प्रभाग अधिकारी, अतिक्रमण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग,  आरोग्य विभागाकडील जवळपास २०० अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या सह आधार रेस्क्यू फोर्स, माणुसकी फौंडेशन इचलकरंजी, पोलिस बॉईज इचलकरंजी, वीर रेस्क्यु फोर्स इचलकरंजी,पट्टिचे पोहणारे स्वयंसेवक तसेच  २ यांत्रिक बोटी, ३ क्रेन, अग्निशमन वाहन, 

४ रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह  (इचलकरंजी महानगरपालिका, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, एन.यु. एच.एम.,  सेवाभारती रुग्णालय, क.बा. आवाडे चॅरिटेबल ट्रस्ट) यांचा समावेश आहे.

महानगरपालिकेच्या या सर्व यंत्रणेवर आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, तैमूर मुलाणी, सोमनाथ आढाव यांचे  नियंत्रण राहणार आहे.   तरी पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील ‍सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन शहापूर खण येथे करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या कडुन करणेत येत आहे.

       

             

Post a Comment

Previous Post Next Post