विविधतेतून एकता या थीम खाली निघाली मिरजेतून भव्य तिरंगा रॅली....

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर शिंदे

मिरज : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विविधतेतून एकता या थीम खाली मिरजेतून भव्य अशी तिरंगा रॅली निघाली,माजीस्थायी समिती सभापती व जेष्ठ नेते मा.सुरेश(बापू) आवटी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक निरंजन आवटी आणि संदीप आवटी यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कार्यकाळात मिरज शहरातील अनेक चौकाचे सुशोभीकरण झाले 


त्यातीलच एक महात्मा गांधी चौक या ठिकाणी जिल्ह्यातील पहिला 365 दिवस आणि 24 तास फडकत असणारा 100 फुटी तिरंगा झेंडा आणि मिरजेतील प्रसिद्ध तंबोरा आणि सतार यांची प्रतिकृती असणाऱ्या चौकाचे सुशोभीकरण 15 ऑगस्ट रोजी आजी माजी पालकमंत्री तसेच प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पाडण्यात येणार असून आज मिरजेत 15 ऑगस्ट चे औचित्य साधून जवळपास मिरज शहरातील सर्वच शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत भव्य तिरंगा रॅली पार पाडली या मध्ये 375 फूट तिरंगा झेंड्याचे या रॅलीत समावेश करण्यात आला होता, तर   या रॅलीत पोलीस व पोलीस अधिकारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते, होमगार्ड विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर विनोद परमशेट्टी सौ खाडे वहिनीसाहेब सामाजिक कार्यकर्ते महादेव नलवडे सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील बाळासाहेब असवले बाबासाहेब आळतेकर सुशांत खाडे आणि नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत सदरची रॅली ही मिरज हायस्कूल मिरज येथून महात्मा गांधी यांच्या स्मारकापर्यंत संपन्न झाली ही रॅली ना भूतो ना भविष्य अशी निघाली

Post a Comment

Previous Post Next Post