महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप अजित पवार हे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्यावर शिक्कामोर्तब

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप अजित पवार हे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या २५ आमदारांकडून पाठिंबा मिळाला असून ते या सर्व आमदारांसह राजभवनात दाखल झाले आहेत. ऐवढंच नाही तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील राजभवनात पोहचल्या आहेत. सध्या राजभवनामध्ये भाजप, शिंदे गटाचे नेते मंडळी देखील उपस्थित आहेत.

राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे, अमोल कोल्हे हे देखील राजभवनामध्ये उपस्थित आहेत. राष्ट्रवादीच्या या सर्व आमदार आणि नेत्यांनी अजित पवार यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या काही आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे यांच्यासह जवळपास 18 आमदार उपस्थित होते. मात्र या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गैरहजर होते. तर काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर अजित पवार हे सर्व आमदारांना घेऊन थेट राजभवनाच्या दिशेने निघून गेले.

Post a Comment

Previous Post Next Post