सांगलीच्या खणभाग परिसरातील हिंदूत्वाच्या धगधगत्या अग्नीकुंडाचे देवाज्ञा .

                       


प्रेस मीडिया लाईव्ह :

मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर शिंदे 

हिंदू एकता आंदोलन संघटनेचे आद्य संस्थापक अध्यक्ष नारायणराव तुकाराम कदम (पापा)यांचे सांगली मुक्कामी वृद्धापकाळाने वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

                      भावपूर्ण श्रद्धांजली 

  स्वर्गिय नारायणराव कदम यांनी महाराष्ट्रात प्रथम सांगलीत स्व. बापूसाहेब साठे यांच्या साथीने हिंदू एकताची पायाभरणी करून ४३ वर्षापूर्वी संपूर्ण हिंदूस्थानात सर्व धार्मियांना समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे या मागणीचे रणशिंग फुंकले. त्या दृष्टीने आत्ता कुठे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सकरात्मक पाऊले उचलली आहेत. आणि समान नागरी कायदा लागू होण्याचे संकेत मिळत असतांनाच नारायणराव कदम हे आपल्यातून निघून गेले याची सल सतत सर्व हिंदुत्ववाद्याच्या मनात राहील्याशिवाय राहणार नाही.

  १९८० च्या दशकात नारायणराव यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कांही जिल्हे हे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भारावल्या सारखे सरसावले.

  त्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांनी सत्तेच्या जोरावर महाराष्ट्रातील हिंदू एकताच्या अनेक नेते व कार्यकर्ते यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर मात करून हिंदूत्वाची पताका खांद्यावर घेऊन ती फडकत ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य नारायणराव यांनी मोठ्या हिंमतीने केले. त्यात त्यांच्या कुंटुबियांची होरपळ झाली. पण त्यांच्या सौभाग्यवतीनी मोठ्या धीराने तोंड देत आपलला संसार सावरण्याचे शिवधनुष्य तर पेललेच पण आपल्या सर्व मुला मुलींच्या शिक्षणात सुद्धा दुर्लक्ष होऊ दिले नाही.

  आज स्व. नारायणराव कदम यांची कन्या जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून न्यायालयीन कामकाज करत आहेत.

  स्व नारायणराव कदम (पापा ) यांच्या पश्चात पत्नी. मुले. मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे.

  त्यांच्या निधनाने कदम परिवारास झालेल्या दुःखात.

   हिंदू एकता आंदोलन संघटना व सर्व हिंदुत्ववादी संघटना  सहभागी असून. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त करो. हिच प्रार्थना

Post a Comment

Previous Post Next Post