लाच प्रकरणी तलाठी सह आणखी एक जण एसीबीच्या जाळ्यात..



                         

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर- खरेदी केलेल्या जमीनी फ़ेरफ़ार नोंद करण्यासाठी  20 हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यारा सर्जेराव शामराव घोसरवाडे (वय 41 रा.प्लॉट नं.108 ,स्वप्नपुर्ती अपार्टमेंट पुईखडी ,कोल्हापुर) आणि त्याचा साथीदार साहील यासीन फरास (वय 23 रा.साजणी )या दोघांना लाच प्रकरणी अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक  श्री.सरदार नाळे यांनी माहिती दिली कि ,तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमीनीच्या दस्त फ़ेरफ़ार मध्ये नोंद करण्यासाठी आणि शेतजमीनीवर तक्रारदाराच्या वडीलांनी ब्यँकेकडुन घेतलेल्या कर्जाचा तारण दस्तात फ़ेरफ़ार करून नोंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांची लाचे मागणी केली होती त्या मुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती.याची खात्री करून आज सापळा रचून तलाठी याचा साथीदार साहील फरास याला 20 हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेऊन चौकशी केली असता असता त्याने तलाठी यांच्या साठी त्याच्या सांगण्यावरुन घेत असल्याचे सांगताच तलाठी घोसरवाडे याला तात्काळ ताब्यात घेऊन दोन्ही आरोपीना अटक करून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मा.श्री.अमोल तांबे ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती शितल जानवे ,मा.श्री.विजय चौधरी पुणे ,यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपतचे कोल्हापुर उपअधीक्षक श्री.सरदार नाळे ,PSI  श्री.संजीव बंबरगेकर यांच्यासह त्यांच्या पथकानी कारवाईत भाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post