केंद्र व राज्य सरकारने विधवा महिलांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलावी - ना.डॅा.नीलम गोऱ्हे.



प्रेस मीडिया लाईव्ह :

दि २३  जून २०२३ रोजी मुक्ती अभियान राष्ट्रीय आयोजित. दिल्ली येथील राष्ट्रीय विधवा महिला परिषदेत दृक श्राव्य माध्यमातून बोलताना महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्र पुणे याच्या अध्यक्षा डॉ. नीलम ताई गोऱ्हे या म्हणाल्या.

आज आपण एका विशिष्ट टप्यावर येऊन पोहोचलो आहोत. मात्र पुढे अजून काम करण्यासाठी आपल्याला एकजूट होण्याची गरज आहे. माणसाची जेव्हा प्रगती होते ती वेगवेगळ्या टप्प्यात होते आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती, वैचारिक प्रगती तशी आपली एका टप्प्यावर प्रगती झालेली आहे. परंतु विधवा महीलांबरोबर  काम करताना आपल्याला अजूनही खूप  प्रयत्न करण्याची गरज दिसून येते. 

यावेळी त्यांनी लातूर भूकंपग्रस्त महिलांचे उदाहरण दिले जेव्हा अनेक महिला विधवा झाल्या आणि त्यांच्या विविध समस्या लोकांसमोर मोठ्या प्रमाणावर आल्या. आजही अनेक ठिकाणी रितीपरंपरानुसार एखादी महिला विधवा झाली तर महिनोन्महिने तिचे घराबाहेर पडणे बंद केले जाते आणि मग आजूबाजूची कामे करण्यासाठी, अनेक निर्णय घेण्यासाठी जमीन- जुमल्याचे काम करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणाची काम करण्यासाठी तिला इतर व्यक्तींवर,अवलंबून राहावे लागते. आणि त्याचा परिणाम असा होतो की अनेक वेळेला प्रॉपर्टीचा किंवा अनेक गोष्टींचा हक्क या महिला दुसऱ्यांच्या हातात देऊन बसतात.ही गोष्ट बदलली पाहिजे. कुठल्याही धर्माची महिला असली तरी दहा ते पंधरा दिवसांमध्ये सगळे विधी संपू शकतात आणि त्यानंतर ती स्वतःच्या आयुष्याचा ताबा घेऊ शकते आणि तो घेतलाही पाहिजे.  तसेच अनेकदा अनेक लोक मदत या महिलांना करण्यासाठी येतात परंतु त्या वेळी देखील थोडे जागरूक राहून समोरील व्यक्तीचा मदत करण्याचा हेतू काय आहे याचा विचार केला पाहिजे आणि सावध राहिले पाहिजे.

महाराष्ट्र शासनाने भुकंपकाळात ९३ साली शासन निर्णय मध्ये स्पष्ट केले होते की तीन वर्ष तरी कुठल्याही प्रकारचा जमिन खरेदीचा व्यवहार होता कामा नये त्याचा परिणाम म्हणजे हजारो शेतकरी महिलांच्या जमिनींचे संरक्षण झाले. आपत्ती काळात असे एकल महिला हिताचे पालन व्हायला हवे.स्त्री आधार केंद्राने या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये महिलांना फर्टीलायझर्स, उत्तम बी बियाणे, चांगल्या प्रकारचे वित्तीय योगदान देऊन त्यांना त्यांची जमीन कसण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.

त्याच बरोबर  मुलींना शिकून स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे. जेणेकरून जेंव्हा एखाद्या महिलेवर संकट येईल ती अशा प्रकारच्या संकटाला तोंड द्यायला तयार असेल. या पुढे बोलताना डॉ नीलम ताईंनी परिषदेतील महिलांना आवाहन केले की एखादी गोष्ट अथवा एखादा व्यवहार तुमच्या मनाविरुद्ध होत असेल तर महिलांनी नाही म्हटलं पाहिजे. एका अंगणवाडी विधवा महिलेने  समाजापुढे एक चांगला आदर्श घालून दिल्याबाबतचा अनुभव सांगितला. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्याप्रमाणे विधवा झाल्यानंतरही राज्याचा गाडा आपल्या हाती घेतला व आपले  आयुष्यभर समाजकार्य केले. हा त्यांचा आदर्श त्यांच्या विचारांचा आदर्श आपण सर्वांनी घेऊन आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे. या कार्यक्रमाचे संयोजक श्रीमती. बरखा लकडा त्याबरोबर मान्यवर श्री. प्रमोद झिंजाडे,श्री. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, डॅा. सुधीर कुमार, श्री. चंद्रमोहन सिंग पपने, रेणू भाटीया देवेंद्रसिंग मित्तल आदि मान्यवर उपस्थित होते. आणी या कार्यक्रमात राष्ट्रीय विधवा महिला परिषदेत दृक श्राव्य माध्यमातून डॅा. गोऱ्हे यांनी संबोधित केले.

Post a Comment

Previous Post Next Post