इचलकरंजीत कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ब्राम्हण युवा मंच व मारवाडी युवा मंचने जपली सामाजिक बांधिलकी 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील ब्राम्हण युवा मंच आणि मारवाडी युवा मंच यांच्यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग मारवाडी युवा मंच मुख्यालय दिल्लीतून आलेल्या कॅन्सर डिटेक्ट व्हॅनच्या माध्यमातून इचलकरंजीत 91 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

येथील ब्राम्हण युवा मंच आणि मारवाडी युवा मंच यांच्यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी लायन्स ब्लड बँकेच्या सहकार्यानं कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मारवाडी युवा मंच मुख्यालय दिल्लीतून कॅन्सर डिटेक्ट व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती. या शिबीराचे उद्घाटन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, डॉ. गोविंद ढवळे, भुल तज्ञ डॉ. शरद मिठारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल डाळ्या,  प्रकाश गौड, अ‍ॅड. भरत जोशी, सत्यनारायण ओझा, अरविंद शर्मा, विनय महाजन, महेश व्यास, विष्णुप्रसाद दायमा उपस्थित होते. यावेळी डॉ. ढवळे यांनी कॅन्सरबद्दल परिपूर्ण माहिती विषद करून कॅन्सरबद्दलची भीती आणि शंकाचे निरसन केले. आधुनिक वैद्यकीय साधन सामुग्रीने युक्त या कॅन्सर डिटेक्ट व्हॅनच्या माध्यमातून 91 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रदीप वैष्णव, करनसिंग राजपुरोहित, ईश्‍वर बोहरा, संकेत शर्मा, रामकिशोर जोशी, कमलकिशोर जोशी, अमित वैष्णव, राहुल ओझा, चेतन दायमा, योगेश वैष्णव, मुकेश खंडेलवाल आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post