पुणे शहरातील मुली आणि महिला बेपत्ता होत आहेत त्यांचा शोध आणि चौकशी बाबत निवेदन सादर.



प्रेस मीडिया लाईव्ह :

 

 पुणे : गेले कित्येक दिवस वर्तमानपत्रातून आणि टीव्ही चॅनल वरून आपल्या पुण्यातील मुली आणि महिला बेपत्ता आहेत असे लक्षात आले. १४ महिला व मुली आपल्या पुण्यामधून बेपत्ता झाल्या आहेत. गेल्या ३ महिन्यांत पुणे जिल्ह्यातून सुमारे ४०० महिला व मुली बेपत्ता झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. ४०० पैकी १४८ महिला व मुली पुणे शहरातील आहेत.




 त्यांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून दुबईला किंवा ओमानला नेण्यात आले आहे की काय किंवा त्या मागे दुसरे काही कारण आहे की काय. त्यांचा ठावठिकाणा त्यांच्या कुटुंबीयांना पण माहीत नाही. राज्य महिला आयोगाने भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत आणि राज्याच्या गृह विभागाला ही दिले आहेत.

     आम्हाला या महिला आणि मुलींच्या जीवनाची चिंता आणि काळजी आहे. असे निवेदन आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, युवक काँग्रेस सरचिटणीस पूनमित तिवारी यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त मा. रितेश कुमार व पुणे शहर पोलीस सहआयुक्त श्री. संदीप कर्णिक साहेब यांना दिले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त मा. पोर्णिमा तावरे व मा. किशोर जाधव हे उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post