राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याने 'आप'कडून साखर वाटप



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : राष्ट्रीय पक्षाच्या निकषांवर पात्र ठरल्यामुळे आम आदमी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून अधिकृत मान्यता मिळाल्याने 'आप' कार्यकर्त्यांनी छ. शिवाजी चौक येथे जमून साखर वाटप केले.


पक्षाला दिल्ली, पंजाबनंतर गोवा आणि गुजरातमध्ये सहा टक्के पेक्षा अधिक मते मिळाल्याने तेथे राज्य पक्षाचा दर्जा मिळाला. चार राज्यात राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळवत राष्ट्रीय पक्षाच्या निकषांवर पात्र ठरल्याने 'आप' हा राष्ट्रीय पक्ष झाला आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सुशासनाच्या माध्यमातून सामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी 'आप' सातत्याने प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याने कार्यकर्त्यांना बळ मिळाले असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पक्ष अधिक ताकदीने पाय रोवणार असल्याचे 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

यावेळी निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, अमरजा पाटील, संजय साळोखे, विजय हेगडे, डॉ. कुमाजी पाटील, लाला बिरजे, सदाशिव कोकितकर, उषा वडर, उमेश वडर, मंगेश मोहिते, महेश घोलपे, डॉ. उषा पाटील, एस्थेर कांबळे, शकील मोमीन, अमरसिंह दळवी, किशोर खाडे, बसवराज हदीमनी आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post