स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी केलेल्या कारवाईत चार यामाहा मोटर सायकल जप्त. केल्या



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी केलेल्या  कारवाईत चार यामाहा मोटर सायकल जप्त केल्या . सुनिल सदाशिव चौगुले, रा. नेर्ली, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांनी आपली यामाहा मोटर सायकल क्रमांक एम. जी. जे. 1541 ही आपले राहते घराचे समोर उभा करून ठेवली असताना ती दि. 28.03.2023 रोजीचे दि. 29.03.2023 रोजीचे दरम्यान रात्रौ कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेबाबत त्यांनी दिले फिर्यादी प्रमाणे गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 65/2023, भा. द. वि. स. क 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.


मा. श्री. शैलेश बलकवडे साो, पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यांना प्रतिबंध होवून मोटर सायकल चोरीचे घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करुन कारवाई करणे करीता विशेष मोहिम राबविणे बाबत सुचना दिल्या होत्या .मा. पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, महादेव वाघमोडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथके तयार करुन पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांना घडलेल्या गुन्ह्यांचे ठिकाणी भेटी देवून गुन्हा केलेची पध्दत व तांत्रिक दृष्ट्या तपास करून तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन केले होते.  दिनांक 02.04.2023 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अमंलदार आयुब गडकरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे, कडील यामाहा मोटर सायकल चोरीचा गुन्हा हा सुरज नामदेव इरकटे, रा. तामगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर याने केला असून तो सदर गुन्हयातील चोरलेली यामाहा मोटर सायकल विक्री करणे करीता आर. के. नगर कडे जाणारे रोडलगत असले कुष्ठधाम इमारती समोर येणार आहे.

 मिळालेल्या माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार राजीव शिंदे, संभाजी भोसले, बालाजी पाटील, आयुब गडकरी, फिरोज बेग व राजेद्र वरंडेकर यांनी आर. के. नगर कडे जाणारे रोडवर कुष्ठधाम इमारतीचे समोरील बाजूस सापळा लावून 01) सुरज नामदेव इरकटे, व. व. 25, रा. शिवराय गल्ली, पाण्याचे टाकीजवळ, तामगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर सध्या रा. नेर्लेकर गल्ली, सांगवडेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यास त्याचे कब्जातील यामाहा मोटर सायकलसह ताब्यात घेतले. आरोपीचे कब्जात मिळालेले यामाहा मोटर सायकलबाबत अधिक चौकशी केली असता कब्जात मिळालेली यामाहा मोटर सायकल ही चोरीची असून त्याबाबत गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे, गु.र.नं. 65/2023, भा.द.वि.स. क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल असलेचे निष्पन्न झाले. नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने गेले चार महिन्याचे कालावधीत तो राहत असले गांवचे आसपासचे परीसरातून आणखीन दोन यामाहा मोटर सायकल चोरलेची कबुली दिलेने त्या चोरीच्या आणखीन 02 यामाहा मोटर सायकल आरोपीचे माहितीने जप्त केल्या आहेत. आरोपीचे कब्जात गोकुळ शिरगांव पोलीस ठाणेकडे दाखल असलेल्या गुन्हयातील यामाहा मोटर सायकल मिळुन आलेने आरोपीस पुढील कारवाई करीता गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे येथे रिपोर्टाव्दारे हजर केलेले आहेत. तसेच नमुद पोलीस पथकास दिनांक 31.03.2023 रोजी टेंबलाईवाडी, कोल्हापूर रेल्वेफाटका शेजारील उड्डाण पुलाचे खालील बाजुस आरोपी नामे 01) आदर्श उत्तम कांबळे, व. व. 22 व 02 ) मनोज उर्फ प्रशांत सुभाष कांबळे, व. व. 26, दोघे रा. आदर्शनगर इंगळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या दोघांना त्यांचे कब्जातील चोरीचे यामाहा मोटर सायकलसह पकडले आहे. त्याचे कब्जात मिळालेले चोरीचे यामाहा मोटर सायकलबाबत हुपरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 37/2023, भा. द. वि. स. क 379 प्रमाणे गुन्हा दाखल असलेने नमुद आरोपींना रिपोर्टाव्दारे हुपरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहेत. नमुदतपास पथकाने एकूण 03 आरोपींना पकडुन त्यांचेकडून 01,50,000/- रुपये किंमतीच्या चोरीच्या एकूण 04 यामाहा मोटर सायकल जप्त केलेल्या आहेत.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. शैलेश बलकवडे साो व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री देसाई मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार राजीव शिंदे, संभाजी भोसले, बालाजी पाटील, आयुब गडकरी, फिरोज बेग, राजेद्र वरंडेकर, रफीक आवळकर, संजय पडवळ, संतोष पाटील तसेच सायबर पोलीस ठाणेकडील सचिन बेंडखळे व प्रदीप पावरा यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post