घोरपडे नाट्यग्रह खाजगी करण्याकरता मनसेचा चित्रपट सेनेचा तीव्र विरोध

  इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन....


प्रेस मीडिया लाईव्ह :

महाराष्ट्र निर्माण चित्रपट सेनेच्या वतीने आयुक्तांना घोरपडे नाट्यगृह खाजगी करण करू नये याकरता निवेदन देण्यात आले.  निवेदनात असे म्हटले आहे की देखभाल दुरुस्ती त्यातील उत्पन्न यातून श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह भाडेतत्त्वावर महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे तर शहरातील संस्कृत वारसा जपण्यासाठी नाट्यगृह भाड्याने देऊ नये कलाकार यात खाजगीकरण याचा त्रास होणार आहे व मक्तेदार चे वर्चस्व राहणार आहे असे  आपल्या निवेदनात म्हटले आहे .

शिष्ट मंडळाकडून  असे सांगण्यात आले आहे की नगरपालिका असताना इचलकरंजी त्या वेळेला आपण नाट्यगृह नगरपालिकेकडेच होते परंतु महानगरपालिका झाल्यानंतर खाजगीकरण करण्याचे नाट्क करायचं का ?  असाही प्रश्न त्यांना करण्यात आला आहे .  इचलकरंजी वस्त्र नगरी बरोबर एक कलाकारांची नगरी आहे इथे अनेक कलाकार संगीतकार होऊन गेलेले आहेत घोरपडे नाट्यगृहाचे  जर खाजगीकरण झाले तर आम्ही तीव्र विरोध करू व असे इशारा देण्यात आला आहे . निवेदन देताना  मनसे इचलकरंजी शहराध्यक्ष #प्रतापराव #पाटील मनसे चित्रपट सेनेचे शहराध्यक्ष #अनिल #कदम शेतकरी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष #रामचंद्र #बागलकोटे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष #अनिल #झाडबुके विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष #रोहित #कोटकर मनसेचे इचलकरंजी सहसचिव #किरण #कोल्हापुरे #रमेश #पस्तादे वाहतूक सेना तालुका उपाध्यक्ष चित्रपट सेना शहर उपाध्यक्ष #प्रथमेश #मेघाडे व #शुभम #माने यांच्यासह पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post