पनवेल तालुक्यातील बोरले गावात तील रेशनिंग दुकानदाराची उडवा उडवीची उत्तरे

   आम्हाला वरून आलेले धान्य  तेवढेच आम्ही देऊ


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

महाराष्ट्र शासन मे 30 डिसेंबर 2022 रोजी जीआर काढला होता ,    राशनच्या दुकानावर  प्रत्येक व्यक्तीस तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू देण्यात येतील आणि तेही मोफत , पण सध्या बोरले गावातील राशन दुकानावर अशी परिस्थिती आहे की  तांदूळ तीन किलो दिले जात आहेत ,  आणि गहू मात्र प्रत्येक व्यक्तीस एक किलो दिले जात आहेत ,







  या बाबत त्यांना विचारणा केली असता , ते सरळ  उडवा उडवीची उत्तर देऊन ,  ते सांगतात की आम्हाला वरूनच कमी देण्यास सांगितलं आहे ,  हे असे आजपर्यंत तीन महिने झाले आहेत ,  जीआर मध्ये येही सांगण्यात आले आहे की ,  दिलेल्या राशींची पावती देण्यात यावी ,  पण ते पावतीही देत नाहीत ,  आणि राशन कार्ड वर एन्ट्री ही करत नाहीत ,  

  जीआर मध्ये सांगितले आहे ,तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू ,  देण्यात येतील ,  त्याच प्रमाणे काही रेशन कार्ड वर एन्ट्री केली जात आहे ,  पण वास्तव्यात तांदूळ दोन किलो आणि गहू एकच किलो दिले जात आहेत ,  ही आपल्या बोरले गावातील राशन दुकान वरची परिस्थिती आहे

Post a Comment

Previous Post Next Post