आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक ०७ मार्च २०२३ रोजी आम्ही आगळी वेगळी धुळवड साजरी केली



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

फ्रेंड्स ऑफ नेचर, (फॉन) चिरनेर उरण चे सदस्य व काही समविचारी निसर्गमित्र ह्यांना सोबत घेऊन आम्ही या वर्षीही वन्यजीव अधिवासातील पाण्याच्या मृत पावलेल्या झऱ्याना नवसंजीवनी देण्याचे कार्य केले.निमित्त होत.....*एक आगळीवेगळी धुळवड व फॉन ची ज्युनियर सदस्य कु.सृष्टी ठाकूर च्या वाढदिवसाच औचित्य

      चिरनेर बापदेव परिसरातील पेरीचे पाणी या पाणवठ्यावर धुळवडीच्या दिवशी श्रमदान करून तिथे झऱ्यास पुनर्जीवित केले..या  पाणवठ्या चा  अनेक वर्षापूर्वी तिथे असणाऱ्या आदिवासी कातकरी समाजाच्या वस्तीकडून  पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत होता पण आता त्या पाणावठ्याचे पाणी तेथील आदिवासी बांधव वापरत  नसल्याकारणाने हा पाणवठा गाळाने बुजला गेला होता.मागील वर्षीही संस्थेने त्यातील गाळ काढून वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था केली होती. सदर परिसरात अनेक दुर्मीळ वन्यजीवांचा  वावर व अस्तित्व अजूनही टिकून आहे व त्यात अनेक  जीव असे  आहेत ज्यांचे अस्तित्वच देशाच्या इतर भागातून नष्ट होत चालले आहे. *(सदर वन्यजीवांची नावे त्यांच्या संरक्षणासाठी मुद्दाम गुप्त ठेवली आहेत)*

उरणच्या सर्व भागात विकासाच्या नावाखाली जी निसर्गाची जी भयानक कत्तल होतेय, वणवे लावून सर्व वनसंपदा नष्ट करून व डोंगरातील माती चोरून  त्यांना उघडे - बोडके करून  त्यांचं सपाटीकरण करून निसर्गाची जी अपरिमित हानी केली जातेय त्याची झळ मानवाबरोबर इतर वन्यजीवांना ही भोगावी लागतेय.काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांत *उरण वायू प्रदूषणा* च्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहचलेला आहे.ही बातमी वाचून अजून होळीमध्ये किती वृक्षांचा आपण बळी देणार? हा विचार मनात येतो.

आपण आपल्या हिंदू धर्मानुसार प्रतीकात्मक होळी साजरी करू शकतो की! बदलत्याकाळात आपण  आपल्या वागण्यात जसे बदल करुन घेतलेत तसे विचारात ही बदल घडवण्याची हीच ती वेळ! निसर्गावरचा ताण काहीप्रमाणात कमी व्हावा इतकाच ह्या पोस्टचा शुद्ध हेतू..

 फॉन टीम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक ०७ मार्च २०२३ रोजी आम्ही आगळीवेगळी धुळवड साजरी केली


Post a Comment

Previous Post Next Post