ई क्लास जमिनीमधून मूरुमाचे उत्खनन



प्रेस मीडिया लाईव्ह :

 राहुल सोनोने  : (मळसुर)

मळसुर : पातूर तालुक्यातील चान्नी उमरा मार्गावरील पांगरा परिसरात शासकीय जागेतून जेसीबी मशिनद्वारे मुरुमाचे उत्खनन करून अवैध वाहतूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार दि. 25 मार्च रोजी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून पांगरा परिसातील शासकीय जागेतून जेसीबी मशिनद्वारे मध्यरात्री मुरुमाचे उत्खनन करून ट्रॅक्टरने अवैध वाहतूक सुरु आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचे चित्र आहे. या शासकीय जागेतून मुरुमाचे उत्खनन कुणी केले अद्यापही स्पष्ट झाले नाही मात्र शासकीय जागेतून मुरुमाचे उत्खनन झाल्याचे उघडकीस आल्याने परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले असून, मुरुमाचे उत्खनन केल्याच्या ठिकाणचे फोटो जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना पाठवतच महसूल विभागाचे पथक त्या ठिकाणी पोहोचले, असून प्राथमिक पाहणी केली असता, मुरुमाचे उत्खनन झाल्याचे उघडकीस आले, उत्खनन करणाऱ्या विरुद्ध गौण खनिज चोरी अधिनियम अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करून दांडत्मक कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थाकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post