शुक्रवारी माथेरान बंद.... ग्रामस्थांचा मोर्चा

 माथेरान पर्यावरण संवेदनशील फोरमचा निर्णय

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

माथेरान मध्ये तीन महिन्यांसाठी सुरू असलेली पर्यावरण पूरक ई रिक्षा पुन्हा सुरू व्हावी आणि माथेरान मधील रस्त्यांची थांबलेली कामे पुन्हा सुरू व्हावीत या मागणीसाठी येत्या शुक्रवारी माथेरान बंद ठेवले जाणार आहे.त्याचवेळी माथेरान पर्यावरण संवेदनशील फोरमच्या माध्यमातून माथेरान अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे अशी घोषणा आज फोरम ने घेतलेल्या बैठकीत निश्चित केली.

 


   माथेरान मध्ये सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाने तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर पायलट प्रकल्प म्हणून राबविलेली ई रिक्षा प्रकल्पच एवढी पूर्ण झाल्याने बंद करण्यात आली आहे.त्यामुळे ही i रिक्षा पुन्हा व्हावी यासाठी माथेरान पर्यावरण संवेदनशील फोरम स्थापन करण्यात आले आहे.त्या माध्यमातुन नवी दिल्ली येथील सर्वोच्य न्यायालयात दाखल झालेली पीटिशन समोर आपली बाजू मांडण्यासाठी चांगले वकिलांचे पॅनल देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.तेथे माथेरान मधील सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाला दोन महिने स्थगिती देण्यात आली आहे हे लक्षात घेवून टी स्थगिती न्यायालयाने उठवावी आणि माथेरान मधील धूळ विरहित रस्त्यांमध्ये रूपांतर करण्याची सुरू असलेली कामे पूर्ण करावीत यासाठी तसेच शासनाने राबविलेल्या पायलट प्रोजेक्ट च अहवाल लवकरात लवकर सादर करावा या मागणी साठी आज 14 मार्च रोजी या फोरम कडून ग्रामस्थांची एक बैठक गुजरात भवन हॉटेल येथे घेण्यात आली.त्यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर,माजी उप नगराध्यक्ष आकाश चौधरी,माजी नगरसेवक प्रदीप घावरे,राकेश चौधरी, चंद्रकांत जाधव, पर्यावरण प्रेमी मुर्तुझा ताहेर माथेरानवाला,तसेच नितीन शाह,मनोज जांभळे,अनंता शेलार,माजी नगरसेविका प्रियांका कदम,मुख्याध्यापिका कल्पना पाटील आणि सुहासिनी शिंदे आदी सह माथेरान मधील स्थानिक नागरिक आणि व्यापारी तसेच हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

                    या बैठकीत माथेरान महसूल अधीक्षक कार्यालयात 16 मार्च रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यावेळी माथेरान मधील बाजारपेठ बंद ठेवली जाणार आहे आणि त्यासाठी माथेरान पर्यावरण संवेदनशील फोरम कडून आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला.तर मोर्चा हा ई रिक्षचा पायलट प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रकलपाचा अहवाल शासनाला तत्काळ सादर करावा आणि सनियंत्रण समितीने ई रिक्षा सुरू करण्यासाठी सकारात्मक विचार करावा अशी मागणी आहे.तर हा मोर्चा माथेरान मधील श्रीराम चौकातून निघणार असून मोर्चाची घोषणा फोरम कडून आज करण्यात आली

Post a Comment

Previous Post Next Post