महापालिकेच्या महिला स्वच्छतागृहांचा 'आप'ने केला पर्दाफाश



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : महापालिकेच्या महिला स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी, लाईट-पाण्याची सोय करावी, येत्या बजेटमध्ये स्वच्छतागृहांसाठी दोन कोटींची तरतूद करावी या मागण्यांचे निवेदन महापालिका उपायुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आले होते. येत्या 8 मार्च पर्यंत यावर सकारात्मक कार्यवाही करावी अशी मागणी 'आप' महिला आघाडीच्या वतीने केली गेलेली. परंतु, या मागण्यांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने आम आदमी पार्टीच्या महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी बिंदू चौक वाहनतळ येथील महिला स्वच्छतागृहांच्या परिस्थितीचा पर्दाफाश केला. 

बिंदू चौक येथील वाहनतळ येथे ई-टॉयलेट बंद अवस्थेत होते, शेजारील स्वच्छतागृहांची अवस्था अस्वच्छ, वापरण्यास अयोग्य, लाईट व पाण्याचा अभाव असल्याचे महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. एकीकडे स्वच्छ व हायजनिक स्वच्छतागृह बांधले जातील असा दावा महापालिका करत आहे, तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था किळसवाणी असल्याचे दिसते. त्यामुळे आधी या स्वच्छतागृहांची स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेने यंत्रणा राबवावी अशी मागणी 'आप'च्या महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील यांनी केली.

यावेळी संघटक पल्लवी पाटील, डॉ. उषा पाटील, पूजा आडदांडे, पूनम ठाकरे, वंदना कांबळे, यांच्यासह संजय साळोखे, अभिजीत कांबळे, राकेश गायकवाड, विजय हेगडे, दुष्यंत माने, समीर लतिफ, सदाशिव कोकितकर, भाग्यवंत डाफळे, नजिल शेख, आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post