पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव कारणे रिक्षाला उडवलं , एकाचा जागीच मृत्यू , तर ४ जण जखमी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव कारणे रिक्षाला उडवल्याची घटना घडली आहे. सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या या अपघातात कारने पाठीमागून रिक्षाला धडक दिली.या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले आहेत. सोरतापवाडी फाटा परिसरात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

भानुदास गोरे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सुनीता जगताप आणि इंदू जगताप असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. याशिवाय विष्णू राजाराम अंधारे आणि छाया अंधारे (दोघेही रा. सोरतापवाडी, ता. हवेली) अशी किरकोळ जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post