निवडणूक हरण्याच्या भीतीपोटी भाजप लोकशाहीचा गळा घोटत आहे -रवींद्र धंगेकर



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : कसब्याची प्रचाराची मुदत संपली असताना भाजपाच्या नेत्यांनी मतदारसंघात रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करत होते. भाजपाचे वरिष्ठ नेते, पालकमंत्र्यासह अनेक मंत्री पोलिसांच्या उपस्थित प्रचार व पैस्यांचे वाटप केले. त्यामुळे ही लोकशाहीची हत्या  होत आहे. हा सगळा प्रकार निवडणूक आयोग, पोलिसांसमोर होत आहे. मात्र तरीही त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसदेखील दिली नाही. 


पोलिसांकडून माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटीदेखील होत आहे. गुन्हेगार आणि पोलिसही त्यांच्यात सामील झाले आहेत, अशा संतप्त भावना व्यक्त करीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी सपत्नीक  कसबा गणपती मंदिरासमोर धरणे धरले. रविंद्र धंगेकर यांनी केलेल्या मागणीची चौकशी करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त संदीप सिंह गील यांनी आश्वासन दिल्यानंतर धंगेकर यांनी दुपारी आपले धरणे मागे घेतले.

कसबा पोटनिवणूकीचा 24 फेबुवारी हा शेवटचा दिवस होता. निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांना मतदारसंघातील  प्रत्येक कानाकोपर्‍यातून मतदारांचा त्यांना पाठींबा आहे. त्यामुळे भाजपाला आपला पराभव दिसून येत असल्याने प्रचाराची वेळ निघून गेल्यानंतर भाजप नेत्यांनी पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. या विरोधात सकाळी 10 वाजता कसबा गणपती मंदिरासमोर सपत्नीक धरणे धरले होते. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार रमेश बागवे, अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, पुजा आनंद, बाळासाहेब आमराळे, रमेश अय्यर, विक्रम खन्ना, सौरभ आमराळे, विजय खळदकर, राजेंद्र भुतडा, अमर गायकवाड,  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रुपाली ठोंबरे, गणेश नलावडे,  अशोक राठी, राजेंद्र आलमखाने, प्रसाद गावडे, प्रदीप गायकवाड, सारिका पारिख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख  संजय मोरे, प्रशांत बधे, गजानन पंडित, राजेंद्र शिंदे, विशाल धनवडे, संतोष भूतकर, मुकूंद चव्हाण, जितेंद्र निजामपूरकर, महेश पवार यांच्या सह पदाधिकारी, कायकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 गेल्या 30 वर्षापासून माझ्या कार्यकर्त्यांना संभाळत असून कार्यकर्ते माझं घर आहे. त्यांना जर कोणी त्रास देत असतील तर ते मी सहन करणार नाही. मला चौकात गोळी मारा पण माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, अशा संतप्त भावना यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, मी नियम पाळतो आहे, पण समोरच्या पक्षाकडून नियम डावलून पैसे वाटले जात आहे. मी लोकशाहीसाठी आंदोलन करतो आहे असेही यावेळी ते म्हणाले.

प्रचार संपला तरीदेखील भाजपा नेते मंडळी, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घरोघरी प्रचार केला जात होता. तसेच भाजपाचे पदाधिकारी कसबा मतदार संघात पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप करीत आहे. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना  मतदार संघ सोडून बाहेर जाण्याचे सांगत पोलिस माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहे. गुन्हेगार आणि पोलिसही त्यांच्यात सामील झाले आहेत, असा आरोप यावेळी रविंद्र धंगेकर यांनी केला. पोलिस राजकीय एजंट म्हणून पैसे वाटप करतात, हे अनेकदा पुराव्यासहीत उघड केले आहे. पोलिसासमवेत ते भाजपा कार्यकर्त्यांचा बिनधास्तपणे वावर होत असल्याने भाजपाकडून सर्व यंत्रणाचा वापर होत असून हा लोकशाहीचा खून होत असल्याची संतप्त भावनादेखील यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केली.

प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी म्हणाले,  रविंद्र धंगेकर यांना कसब्यातून सर्वत्र मतदारांचा मोठा पाठिंबा दिसून येत आहे. त्यांच्या कामामुळे मतदारांकडून त्यांना पसंती आहे, त्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपाच्या उमेदवारांचा पराभव दिसत असल्याने निवडणूक आयोगासह, पोलिस यंत्रणेचा वापर त्यांच्याकडून होत आहे. पोलिसांच्या यंत्रणेत सुरक्षितपणे मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार भाजपाकडून होत आहे. मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करुन कमीत कमी मतदान होण्यासाठी त्यांच्याकडून संपुर्ण प्रयत्न होत आहे. यासंदर्भात आम्ही चित्रफीतीचे पुरावेदेखील दिले आहेत. मात्र पोलिस प्रशासन व निवडणूक आयोगाकडून कोणती कारवाई केली जात नाही. मतदार संघातील भाजपाचे झेंडे, पोस्टर काढले नाहीत, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मतदार संघात पैस्यांचा महापूर भाजपाकडून होत आहे. पुणे शहरात युपी-बिहार सारखे वातावरण  भाजपाने केले आहे. आम्ही संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. या निवडणूकीतून जतना भाजपाला नक्कीच धडा शिकवतील. आमच्या दिलेल्या तक्रारची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आम्ही उपोषण मागे घेतले असेही यावेळी जोशी यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, कसब्यात मतदारांना पैसे वाटून लोकशाहीचा गळा घोटण्यात येत असून यात पोलिसांचा देखील समावेश आहे. पैसे वाटण्याची व्हिडियो क्लिप पुरावे म्हणून देण्यात आले आहेत. मात्र, तरीही कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. पैसे वाटण्याचे प्रकार त्वरित थांबवावे व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.   

माजी राज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले, भाजपाला कोणतीही नितीमत्ता राहिली नाही. आपला पराभव दिसत असल्याने जीवे मारण्याची धमकी, दडपशाही त्यांच्याकडून होत आहे. प्रचार संपला तरीदेखील पोलिस व अधिकाऱ्यांच्या मदतीने पैसे वाटण्याचा प्रकार भाजपाकडून सुरु आहे. लोकशाही मार्गाने निवडणूक लढण्यासाठी पुढे येण्याची हिंमत नसल्याने लोकशाहीचा खून त्यांच्याकडून होत आहे.  भाजपा गैर मार्गाने निवडणूकीला सामोरे जात आहे. मात्र जनता तुमचा पराभव करुन तुमची जागा दाखवून देणार आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांना नाहक अटक करून दहशत निर्माण केली जात आहे. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. भाजप आपल्या सर्व शक्तीचा दुरुपयोग करत आहेत. त्यामुळे, नागरिक भाजपाला मतदानातून धडा शिकवणार आहे. 

अभय छाजेड म्हणाले, कसब्यात वाहतुकीपासून, डे्रनेजलाईन अनेक समस्यांना नागरिक वैतागले आहे. भाजपाची सत्ता असून देखील ते प्रश्न सोडवू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना पैश्याचे अमिश दाखविण्याची वेळ आली आहे. रविंद्र धंगेकर हे त्यांच्या कामातून घराघरांमध्ये पोहचले आहेत, त्यांच्या कामाची पावती त्यांना मिळणार असल्याने भाजपाने सर्व नियमांचे उल्लंघन करुन प्रचारयंत्रणा व पैश्यांचे वाटप, दमदाटी, धमक्या देण्याचे काम सुरु आहे. कसब्यात गैरप्रकार करणार्‍या सर्व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यासह त्यांच्या सामिल असणार्‍यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील यावेळी त्यांनी केली.

संगीता तिवारी म्हणाल्या, कसब्यात हिंदू-मुस्लिम एैक्य, सलोखा आहे. मात्र भाजपाला निवडूकीत पराभव दिसल्याने त्यांच्यात भांडण लावण्यासाठी  शहराला धोका पोहचिविणारे काम भाजपा करत आहे. सर्व जाती, धर्माचे लोक रविंद्र धंगेकर यांच्या पाठीमागे असल्याने भाजप गोंधळले आहेत. 

 रुपाली पाटील म्हणाल्या, हिंदू-मूस्लिममध्ये तेढ लावण्याचे काम भाजपाकडून होत आहे. पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आपल्या सत्तेचा गैरवापर करीत आहे. पोलिस यंत्रणाच भाजपाने आपल्या धावणीला बांधली असल्याने मतदार भयभयीत झाला आहे. भाजपाचे उमेदवारांनी पाच वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना जनतेचा पैसा लुटला आहे. हाच पैसा त्यांनी आपला पराभव दिसल्याने बाहेर काढला आहे. त्यांना साथ देणार्‍या पोलिसांची, मंत्र्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

भाजपा गैरमार्गाने प्रचार यंत्रणा राबवित असल्याने सर्वत्र टिकेची झोड उमटत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत मतदानातून आपली ताकद दाखूवन देणार असल्याचे सांगितले.


 




प्रवीण प्र. वाळिंबे 

माध्यम समन्वयक

९८२२४५४२३४

७३८७००२०९७

Post a Comment

Previous Post Next Post