धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय होणार : मोहन जोशी



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कसब्यात भाजप महायुतीच्या‌ उमेदवारासाठी केंद्रीय मंत्र्यासह राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तळ ठोकून आहेत. त्यांच्याकडून साम-दाम-दंड-भेद वापरले जात आहे, पोलिस व प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी केला. तसेच या निवडणुकीत धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय होणार असल्याने कसब्यात यावेळी नक्कीच परीवर्तन होणार आहे, असा‌ विश्वासही जोशी यांनी व्यक्त केला.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेले तीस वर्षे भाजपचे आमदार होते, पालकमंत्री, खासदार होते. त्यांनी कोणतेही विकासकाम केले नाही. त्यामुळे त्यांना पोट निवडणुकीसाठी केंद्रीय व राज्यातील मंत्री गल्लोगल्ली फिरत आहेत. ते साम दाम दंड भेद चा वापर करत आहेत. भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात पंन्नास वर्षाच्या‌ कामाचा समावेश आहे. ज्यांनी तीस वर्षात काम केले नाही, आज ते पंन्नास वर्षाचे‌ गाजर दाखवत आहेत. भाजप उमेदवाराने स्थायी‌ समितीचे अध्यक्ष असताना विकास कामे केली नाही. त्यांच्या पायाला कसब्याची माती लागली नाही. आम्ही मात्र जनसामान्यात मिसळणारा, सर्वसामान्यांची कामे करणारा उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या रुपाने दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री दडपशाहीचा वापर करत आहेत, त्यामुळे धंगेकर हे प्रचंड मतांनी विजयी होणार. धंगेकरांना आजवर झालेल्या सभा, कोपरा सभा, पदयात्रा आणि रॅल्यांना मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. महाविकास आघाडीत समन्वय असून आम्ही प्रचारात आजपर्यंत आघाडी घेतली आहे. आमच्या‌ तिनही पक्षाच्या कार्यकर्ते आपण स्वत: उमेदवार आहोत असे समजून काम करत आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत परीवर्तन होणार आह

पालकमंत्र्यांच्या विरोधात निवडणुक आयोगाकडे‌ तक्रार :

भाजपच्या नेत्यांना भिती वाटत आहे, पराभव झाला मोदी-शहांना काय सांगायचे तर पालकमंत्री व इतर पदे जातील. त्यामुळे शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, प्रचारासाठी शासकीय वाहने वापरली जात आहेत. कालच पालकमंत्र्यांनी  प्रचाराच्या पदयात्रेसाठी शासकीय वाहन वापरले. त्याचा  फोटो मी स्वत : काढून निवडणुक आयोगाला पाठवला आहे. तसेच पालकमंत्र्यांवर निवडणुक अचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ते पालकमंत्री आहेत, मालकमंत्री नाहीत :

पंन्नास हजाराने हेमंत रासने निवडून येणार असे भाजप नेते सांगत आहेत. त्यांचा विजय एवढा सोपा आहे तर मग ते गुंडांचा आणि शासकीय यंत्रणेचा वापर का करत आहेत, पालकमंत्र्यांना घर बदलून सुभाषनगरमध्ये घर का घ्यावे लागले, मुख्यमंत्री रात्री येतात, तीन तीन पर्यंत कसब्यात फिरतात. पालकमंत्री धंगेकरांना निवडून दिले तर निधी मिळणार नाही, अशी धमकी देत आहेत. ते पालकमंत्री आहेत, मालकमंत्री नाहीत, अशी‌ टीकाही जोशी यांनी यावेळी केली.

Post a Comment

Previous Post Next Post