गावंडगाव येथे दारुचा महापूर !


प्रेस मीडिया लाईव्ह :

मळसूर । पातूर तालुक्यातील ग्राम गावंडगाव येथे मोठ्या प्रमाणात देशी व गावराण दारूची खुलेआम विक्रीचे सत्र सुरू आहे. देशी व गावराण दारू ८ ते १० ठिकाणी सहजतेने उपलब्ध होत असल्याने तळीरामांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होत असून तरुण पिढी व्यसनाकडे वळत असल्याची बाब चिंताग्रस्त करणारी आहे. 

दारू विक्रेत्यांना अधिकृत देशी दारू व्यावसायिकांकडून घरपोच पार्सल स्वरुपात दारू मिळत असल्याची व दारू विक्रेत्यांना राजकीय पाठबळ असल्याची चर्चा गावात असून त्यांना कारवाईचे भय नसल्याने दारू विक्रीला चालना मिळत आहे, दिवसभर मोलमजुरी करून दारूच्या व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने ही गंभीर व चिंताग्रस्त करणारी बाब आहे, पोलीस कारवाईत राजकीय लोकांचा वाढता हस्तक्षेप यामुळे दारू विक्रेत्यांची मुजोरी वाढली असून त्यांना पकडल्यावर सुध्दा सोडविण्यासाठी नेते मंडळी तयार असल्याने त्यांना पोलिसांचे भय राहिले नसल्याचे निदर्शनास येते. सदर दारू विक्रेत्यांना आळा घालणार कोण, असा संतप्त सवाल त्रस्त महिलावर्गाकडून उपस्थित केल्या जात आहे. राजकीय अभय असलेल्या दारू विक्रेत्यांना पोलीस प्रशासन कधी धडा शिकवणार, या प्रतीक्षेत गावकरी आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post