पुणे बंदमुळे शहरात काय बंद राहणार, काय चालू...?



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून आज पुणे बंद पाळण्यात येत आहे.  

पुणे बंदमुळे शहरात काय बंद राहणार, काय चालू राहणार..?  

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत येत असल्याने पुणे जिल्ह्यातील इंधन पंप सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप मालकांनी पोलिसांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. अहवालानुसार, किराणा, बेकरी आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि नंतर दुपारी 3 वाजेपर्यंत बंद पाळतील. बंद दरम्यान वैद्यकीय दुकाने सुरू राहणार आहेत. तर पुणे बंदला पाठिंबा देण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत.

पुणे बंदमुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल

लक्ष्मी रोड - सोन्या मारूती चौक ते अलका टॉकीज चौक (मोर्चा सुरू झाल्यापासून बेलबाग चौकाच्या पुढे जाईपर्यंत)

शिवाजी रोड - स.गो. बर्वे चौक ( मोर्चा सेवासदन चौक पास झाल्यानंतर मोर्चा संपेपर्यंत)

बाजीराव रोड - पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक (मोर्चा सेवासदन चौक पुढे जाईपर्यंत आवश्यकतेनुसार)

गणेश रोड - फकडे हौद चौक ते जिजामाता चौक (मोर्चा सेवासदन चौक पुढे जाईपर्यंत आवश्यकतेनुसार)

केळकर रोड - आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (मोर्चा चौकातून पुढे जाईपर्यंत)

पर्यायी मार्ग -

मोर्चाच्या कालावधीत वरील मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात येत असल्याने वाहन चालकांनी टिळक रोड, केळकर रोड आणि कुमठेकर रोडचा वापर करावा असं सांगण्यात आलं आहे.

पुणे बंद'च्या पार्श्‍वभुमीवर शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आज विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून "पुणे बंद'ची हाक देण्यात आली आहे. यादरम्यान शहरात कोणत्याही स्वरुपाची अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. विविध राजकीय पक्ष संघटना, पक्षांकडून पुकारलेल्या या बंदमध्ये अनेक सामाजिक, स्वयंसेवी संघटनाही सहभागी होणार 

पुणे बंदला मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीचा पूर्णपणे पाठिंबा

मार्केट यार्ड मधील सर्व दुकाने आज बंद कांदे बटाटा विभाग, फुल बाजार विभाग,पान मार्केट यांच्यासह सर्व व्यापारांनी कडकडीत बंद पाळला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आज शिवप्रेमी संघटनांनी पुणे बंदची हाक दिली आहे. यालाच कृषी उत्पन्न बाजार समितीने पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. आहे.





Post a Comment

Previous Post Next Post