चान्नी येथे एका वर्षाच्या लहान मुलीवर माकडाचा हल्ला

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रतिनिधी राहुल सोनोने ( मळसुर) :

*मळसुर*. आलेगाव वन विभागा अंतर्गत येत असलेल्या चान्नी येथे एका माकडांनी केलेल्या हल्ल्यात एका वर्षाच्या लहान मुलीवर माकडाने अचानक हल्ला केल्याची घटना २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. पातुर शहरासह तालुक्यातील चान्नी येथे माकडांचा हैदोस सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. माकडाचे हल्ले. कुत्र्याचे हल्ले रानडुकराचे हल्ले वाढतच चालले असून वन विभाग मात्र सुस्त आहे की काय असा प्रश्न ग्रामस्थांन कडून बोललं जातं आहे. मात्र कित्येक तर गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात चतारी येथील एक विद्यार्थी तसेच रानडुकराच्या हल्यामध्ये झरंडी येथील एक नागरिक सुद्धा गंभीर जखमी झाले होते.या घटनेनंतर शुक्रवारी चान्नी या गावात माकडांनी हैदास घातला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ३ वर्गात शिक्षण घेत असलेली राणी बबन सोळंके वय (९) वर्षाची ही लहान मुलगी ट्युशन वरून परत येत असताना तीच्यावर माकडाने अचानक हल्लयाने ही लहान मुलगी चांगलीच घाबरली आणि तिने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली.तिच्या किंचाळया ऐकूण आई सह ग्रामस्थ धावत आले. जखमी मुलीला माजी सरपंच दशरथ सदार, पत्रकार मनोहर सांनी त्या मुलीला गावातील एका प्रायव्हेट

यामध्ये उपचारार्थ नेले होते. एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीनी वन विभागाशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर दिले नाही. या प्रकाराकडे वन विभाग माकडे पकडण्यासाठी उठले कठोर पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या माकडांच्या अश्या प्रकारच्या हल्ल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

चौकट

हल्ल्यात एका वर्षांची मुलगी जखमी या लहान मुलीचे नाव राणी बबन सोळंके असल्याचे सांगण्यात येते आहे. माकडाने केलेल्या या हल्ल्यात राणी हिच्या हातावर आणि कमरला थोडे बोरकाटले आहे. या घटनेनंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या मुलीवर झालेल्या हल्ल्याबद्दल त्या परिसरात खळबळ उडाली आहे.

माकडांच्या हल्ल्यांपासून सावधान

चौकट.....

माकडांच्या हल्ल्यांपासून सावधान सध्या थंडीचे दिवस आहेत, अनेक जण शेकोट्या पेटून बाहेर बसत आहेत.तसेच सध्या माकडे खायला प्यायला धुमाकूळ घालत आहेत. अनेक पर्यंटन स्थळांवर, गडांवर आणि तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ही माकडेही आता माणसांना धटावलेली असल्याने ती माणसांच्या अंगावर धावून येतात. त्यांच्याकडील बॅगा आणि पिशव्या पळवण्याचेही प्रयत्न माकडांपासून होत असतात. अशा स्थितीत या माकडांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 

प्रतिक्रिया

माझी मुलगी ट्युशन वरून घरी येत असताना छतावरील माकडाने माझ्या मुलीवर हल्ला केला. या माकडांचा रोज खुप मोठ्या प्रमाणावर त्रास होत चालला असून या माकडाला . वन विभागाने गावात हैदोस घालणाऱ्या माकडांना पकडून नेण्यात यावे अशी मागणी परिसरातील महीलासह ग्रामस्थांकडून होत आहे.

सौ.पुजा किशोर सोळंके मुलीची काकू

प्रतिक्रिया

आम्ही हल्ला केला त्या घटनास्थळी हजर होतो त्या मुलीला आम्ही दवाखान्यामध्ये सोता नेऊन उपचार करून घेतला आणी मी वनविभागाला संपर्क केला असता मला त्यांनी सांगितले की मी बाहेर गावला आहे तिथे आमचे कर्मचारी आहेत. आणी मी त्यांना पाटवतो असे सांगून ते मला उडवा उडवीचे उत्तरे देत होते वन विभागाचे अधिकारी

 दशरथ सदार ग्रामस्थ चान्नी

Post a Comment

Previous Post Next Post