गडमुडशींगी येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आ) युवा आघाडीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तिव्र निदर्शने करण्यात आली.



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

 गडमुडशींगी ता.करवीर येथील डाँक्टर व कर्मचारी हे पेशंटना चांगली वागणूक देत नाहित.पेशंटला हात न लावता तसेच न तपासताच औषध देतात.सर्दि,खोकला,ताप   हे झालेल्या पेशंटना औषध व पोटात दुखत असेल किंवा अंग किंवा अशक्तपणा आला असेल तर तेच औषध देतात.त्याच प्रमाणे कायम स्वरूपी दवाखाना शेजारी जे कर्मचारीसाठी काँटर्स बांधल्या आहेत.त्या काँटर्स मध्ये कोणीच उपलब्ध नसते.परवा एका व्यक्तीस संर्प दंश झाला होता त्यावेळी दवाखान्यात व कर्मचारीसाठी बांधलेल्या काँटर्स मध्ये कोणीच नव्हते. 

शेवटी त्या पेशंटला कोल्हापूर येथे नेले.त्यामूळे त्याचा जिव वाचला आता सध्या ऊस तोडणीचे काम चालू आहे.ऊस तोडणीसाठी बीड जिल्ह्यातून मजूर आले आहेत.चूकून त्यांना ऊस तोडत असताना इजा होऊ शकते.पण आरोग्य केंद्रात कोणीच कर्मचारी उपस्थित नसतो याच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आ) युवा आघाडी जिल्हाअध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने जाऊन तिव्र निदर्शने करण्यात आली.शेवटी डाँक्टर व कर्मचारी यांनी झालेल्या चूकी बद्दल दिलगीरी व्यक्त करून परत अशी चूक होणार नाही असे लेखी अश्वासन दिले.

       यावेळी  दादासो कांबळे,गणेश कांबळे,विकास कांबळे,अभिजीत कोगले,श्रीमंत कांबळे,अमर कांबळे,प्रविण कांबळे,अकाश जाधव सुशांत कामत,गजेंद्र कांबळे,संतोष पवार,राम कांबळे,भिकाजी कांबळे,शुभम कांबळे,प्रभुध्द बळे,महादेव कांबळे,सुजित देशमुख,पिंटू जाधव,दशरत कांबळे यांच्यासह पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते*

Post a Comment

Previous Post Next Post