पुणे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बाईक-टॅक्सी विरोधात रिक्षा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली

आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षा फोडल्याची घटना घडली 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बाईक-टॅक्सी विरोधात रिक्षा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याविरोधात आज शहरातील 12 रिक्षा संघटनांनी बेमूदत संप पुकारला आहे.या आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षा फोडल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर तर एका बाईक टॅक्सीवाल्यालाही जमावाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परिणामी या आंदोलनाला गालबोट लागलं आहे. अवैध बाईक-टॅक्सी बंद करण्याची मागणी शहरात अनधिकृतरित्या बाईक टॅक्सी (दुचाकी) सेवा दिली जाते.

या सेवेला राज्य शासनाची परवनागी नाही. स्वस्त आणि जलद सेवा असल्यामुळे नागरिक बाईक-टॅक्सीला प्राधान्य देतात. पण, मोटार वाहन कायद्यानुसार खासगी वाहनांचा वापर करून प्रवासी सेवा देणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे अवैध बाईक-टॅक्सी बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून केली जात आहे.

महिलांसाठी ही सेवा सुरक्षीत नाही. तसेच, अशा बेकायदा बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकाच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे संघटनांचे म्हणने आहे. याविरोधात रिक्षा संघटना एकवटल्यामुळे आरटीअंोकडून वेळोवेळी बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यात आली. तसेच, संबंधीत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post