रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्टच्या वतीने ससून हॉस्पिटलला ५० लाखाची अद्ययावत उपकरणे प्रदान

'सेव्ह द बेबीज' उपक्रमांतर्गत पुढाकार

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्टच्या वतीने ससून हॉस्पिटलच्या बालरोग शस्त्रक्रिया विभागाला ५० लाखाची अद्ययावत वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली.

'सेव्ह द बेबीज' उपक्रमांतर्गत ग्लोबल ग्रॅण्टद्वारे पुढाकार घेऊन रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्ट रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१,रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट,रोटरी क्लब ऑफ पूना डाऊन टाऊन,रोटरी क्लब ऑफ मियामी एअरपोर्ट,रोटरी क्लब ऑफ समरव्हिल आणि देणगीदारांच्या मदतीने हा प्रकल्प मार्गी लावला.या देणगीदारांमध्ये अल्काईल अमाईन्स केमिकल्स प्रा.लि.श्रीमती कुंज छुगानी,दादा फायरवर्क्स,लाईफ इन्स्पिरेशन एडव्हायझरी,ललिता भोसले एन्डोन्मेन्ट फंड,दिनेश श्रॉफ,समीर थवानी,मीरा भवनानी आदींचा समावेश आहे.

अद्यावत शस्त्रक्रिया विभागाचे उदघाटन बी जे मेडिकल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ विनायक काळे,बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ दशमीत सिंग,अल्काईल अमाईन्स केमिकल्सचे उपाध्यक्ष श्री.अय्यर यांच्या हस्ते झाला.यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे एअरपोर्टचे पदाधिकारी उपस्थित होते.ही उपकरणे प्रदान करण्याचा कार्यक्रम २९ नोव्हेंबर रोजी झाला.

या अद्ययावत उपकरणांमध्ये सी आर्म ऑपरेशन टेबल,अनेस्थेशिया वर्कस्टेशन,पेडियाट्रिक सिस्टोस्कोपी युनिट,ब्लड वॉर्मर,पेशंट वॉर्मर,इलेक्ट्रो कॉटरी मशीन,वेसल सिलर आदींचा समावेश आहे.ससून मध्ये दरवर्षी सुमारे १५०० बालकांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते,ही गरज पूर्ण करण्यासाठी या अद्ययावत उपकरणांची  मदत होणार आहे.निवडक खासगी रुग्णालयांकडे असलेली ही उपकरणे या निमित्ताने ससूनमध्ये उपलब्ध झाली आहेत.   




Post a Comment

Previous Post Next Post