दुबई ऑपन इंटरनॅशनल थाई-बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये पुण्याच्या शोएब शेख या सलमानी समाजातील तरुणानी पटकावला सुवर्णपदक

 परदेशात देशाचे नाव  उंचवणाऱ्या शोएब शेख यांचे पुणे जिल्हा सलमानी जमात तर्फे कौतुक.प्रेस मीडिया लाईव्ह :

 अन्वरअली शेख

पुणे दि. १५ दुबई येथे नुकतेच  पडलेल्या   दुबई ओपन इंटरनॅशनल थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप  2022 या स्पर्धेत  पुण्याच्या शोएब शेख या तरुणाने सुवर्णपदक जिंकून देशाचे व पुण्याचे नाव जागतिक पातळीवर उंचवण्याचे महान कार्य केले आहे, सुवर्णपदक जिंकून मायदेशात परतल्यावर पुणे एअरपोर्टवर शोएब यांचे पुणेकरांनी जंगी स्वागत करत फुलांचा वर्षाव केला. पुणे शहरातील रामवाडी या ठिकाणी शोएब अश्फाक शेख राहण्यास आहे, पुण्यातील सलमानी समाजातुन   ( मुस्लिम न्हावी ) येणाऱ्या शोयबने जिद्द व चिकाटीने परिश्रम करत जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पुणे जिल्ह्याच्या सलमानी समाजाने त्यांचे स्वागत केले आहे.  


परदेशात देशाचे नाव  उंचवणाऱ्या शोएब शेख यांचे पुणे जिल्हा सलमानी जमात तर्फे कौतुक होत आहे. 

पुण्याच्या सलमानी समाजातील तरुणांसाठी शोएब शेख यांनि  एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच शोएब शेख सध्या कश्मीर मधील मेहुणी आली कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी जाणार आहेत , पुढच्या वाटचाली मध्ये भरभरून यशस्वी होण्यासाठी शोएब शेख  ला पुणे जिल्हा सलमानी समाज तर्फे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलेला आहे. 


 

Post a Comment

Previous Post Next Post