गंगा जमुनी परंपरा वृद्धिंगत करणे ही आपली जबाबदारी आहे

 डॉ. भारत पाटणकर यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. ७ भारतीय संविधानातील मूल्ये जपायची असतील तर आपण एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे. गंगा जमुनी परंपरा वृद्धिंगत करणे ही आपली जबाबदारी आहे.त्यासाठी सोमवार ता.१० आँक्टोबर रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे होणाऱ्या  "गंगाजमनी मोहब्बतपुरा संकल्प परिषदेत "  सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.भारत पाटणकर यांनी केले.ते या परिषदेच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य ए.बी.पाटील होते.यावेळी हुमायून मुरसल , कॉ.धनाजी गुरव,प्रसाद कुलकर्णी, कॉ. धोंडीबा कुंभार हे  मंचावर उपस्थित होते.हा मेळावा समाजवादी प्रबोधिनीच्या पुढाकाराने आणि इचलकरंजीतील विविध पुरोगामी राजकीय पक्ष,संस्था, संघटनांच्यावतीने आयोजीत केला होता. दत्ता माने व बजरंग लोणारी यांनी पाहुण्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले.धोंडीबा कुंभार यांनी प्रास्ताविक केले.

कॉ.भारत पाटणकर म्हणाले,स्वातंत्र्य आंदोलन व त्यांनंतर निर्माण झालेल्या राज्यघटनेने संपूर्ण स्वातंत्र्य, लोकांचे सार्वभौमत्व,लोकशाही,धर्मनिरपेक्षता,संघराज्यीय एकात्मता,समाजवादी समाजरचना ही मूल्ये नवभारताच्या उभारणीसाठी निश्चित केली.या देशाची वाटचाल शोषणमुक्ती,द्वेषमुक्ती यांच्या आधारे झाली पाहिजे. तसेच शेतकरी, कष्टकरी, समाजातील शेवटचा माणूस यांच्या उत्थानासाठी कार्यरत राहिले पाहिजे असे ठरवले.पण आज ते सोडून वाढती धर्मांधता ,परधर्म द्वेष, निव्वळ भांडवली आर्थिकधोरण, द्वेषावरआधारलेले राजकारण, माणसा माणसात फूट पाडणारे समाजकारण जाणीवपूर्वक केले जात आहे. हे मूठभारांची धर्मांधता जपण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीला धरले जात आहे.हे सर्व धर्मातील मानवतेच्या विरोधामध्ये आहे. म्हणूनच या मानवताविरोधी, संविधानद्रोही विकृती विरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीची गंगा जमुनी हे परंपरा वृद्धिंगत करत एक प्रेमाधारीत समाज निर्माण करण्याची गरज आहे.

यावेळी कॉ.धनाजी गुरव, हुमायून मुरसल,प्राचार्य ए.बी.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.या बैठकीला आनंदा चव्हाण,शिवाजी साळुंखे,प्रा.रमेश लवटे, अरुण निंबाळकर, सुनील बारवाडे,युसूफ तासगावे, तुकाराम अपराध,रामदास कोळी,अभिषेक पाटील,राजू कोन्नूर, संजय रेंदाळकर,महालिंग कोळेकर, रोहित दळवी,कॉ.पार्वती जाधव,इंद्रायणी पाटील,वैभवी आढाव,गौस अत्तार, डी.टी.शिंगे,पांडुरंग पिसे,रावसाहेब निर्मळे,इक्बाल देसाई,इरफान रंगरेज,झाकीर मुजावर,पांडुरंग कुंभार, महेश लोहार,प्रशांत कुंभार,अब्दुल नस्टाडे,संतोष गोटाळ,भाऊ कसबे,आप्पसो कालेकर,अशोक काळे,आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post