ग्रामपंचायत मधील सर्व पद संख्या व भरती प्रक्रिया माहिती .

 ग्रामपंचायत मधील सर्व पद संख्या व भरती प्रक्रिया माहिती .



प्रेस मीडिया लाईव्ह :

गणेश राऊळ :

1)सरपंच - 

   सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक असतो व तो गावाचा लोकप्रतिनिधी असतो जो गावातील लोकांचे प्रतिनिधित्व करीत असतो. या पदाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो .हे पद ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले जाते.

मानधन - हे लोकसंख्यावर अवलंबून असते 

लोकसंख्या 0 ते 2000 =3000 /-प्रतिमहा

लोकसंख्या  2000 ते 8000=4000/-प्रतिमहा

लोकसंख्या 8000 व त्यापेक्षा जास्त=5000/-प्रतिमहा

              

https://chat.whatsapp.com/GeGJEVQbUqc6U4dNLpT5Q8


 *2) उपसरपंच -* 

       सरपंच अनुपस्थित असताना सरपंच पदांचे सर्व कामकाज उपसरपंच करत असतो .मानधन हे लोकसंख्यावर अवलंबून असते.

लोकसंख्या 0 ते 2000 =1000 /-प्रतिमहा

लोकसंख्या 2000 ते 8000 =1500 /-प्रतिमहा

लोकसंख्या 8000 व त्यापेक्षा जास्त  =2000/-प्रतिमहा


 *3) ग्रामसेवक -* 

     ग्रामसेवक पदाची निवड स्पर्धा परीक्षा आयोजित करून करण्यात येते पाहिले तीन वर्षे हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येते पहिले तीन वर्षे 6000/- प्रतिमहा त्यानंतर 5200 -20200 ग्रेड पे 2400 ही वेतनश्रेणी लागू होते .हे पद ग्रामपंचायत चे प्रशासकीय अधिकारी असतो .तो ग्रामपंचायत चे सर्व कामकाज पाहत असतो.


 *4) ग्रामरोजगार सेवक -* 

      ग्राम पातळीवर ग्रामसेवकला मदत करण्यासाठी हा पद असतो .स्थानिक पातळीवर हे पद भरले जाते .महात्मा गांधी रोजगार हमी योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवकास मदत करत असतो .याचे मानधन कामाच्या स्वरूपात नुसार असते


 *5)ग्रामपंचायत शिपाई -* 

      ग्रामपंचायत पातळीवर 2 ते 5 पर्यंत शिपाई पद मंजूर असतात .जे जिल्हा परिषद मार्फत भरले जाते .या पदासाठी पुढे शिपाई सुधारित वेतनश्रेणी वर पदोन्नती मिळते. ग्रामपंचायत शिपाई पदाचे कामकाज ग्रामपातळीवर असणारे सर्व कामकाज करणे बंधनकारक असते. या पदाचे वेतन 5000/-प्रतिमहा असते.


6 ) महसूल विभागातील पदे -

   1)तलाठी - 

       नेमणूक -राज्य सरकार मार्फत करण्यात येते.

       वेतन -5200-20200 ,ग्रेड पे 2400.

 

 *7) कोतवाल -* 

     हे पद ग्रामपंचायत मधील महत्त्वाचे पद असून ग्रामपंचायत मध्ये मदतनीस म्हणून ह्या पदाचे कामकाज असते .नेमणूक स्पर्धा परीक्षा घेऊन हे पद भरले जाते.

वेतन - 5000/- प्रतिमहा .


 *8)पोलीस पाटील -* 

    पोलीस पाटिल हे मानाचे व सर्वात महत्त्वाचे पद आहे. हे पद प्रशासकीय पद आहे. या पदासाठी आता भरती प्रक्रिया राबविण्यात येते. गावातील वाद विवाद मिटवण्यासाठी हे पद कार्यरत असते.

वेतन -6000/- प्रतिमहा.


 *9)कृषी सेवक -* 

     ग्रामपंचायत पातळीवर हे पद कार्यरत असते ह्या पदाचे कामकाज कृषी कामकाज करणे असते. शेतकऱ्यांना मदत करणे .निवड स्पर्धा परीक्षा आयोजित करून कृषी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणाऱ्या मधून निवडले जाते.


- गणेश राऊळ (Mr GR)

Post a Comment

Previous Post Next Post